मलेशियात एआय देवतेची मूर्ती स्थापन
मलेशियातील जोहोर येथे तियानहौ मंदिरात जगातील पहिली एआय आधारित असलेल्या देवतेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मलेशियन टेक्नोलॉजी कंपनी अयमाझिन यांनी ही मूर्ती बनवली आहे. ही मूर्ती क्रीनवर दिसत असून ती पारंपरिक चिनी पोशाखातील एका सुंदर स्त्रीच्या रूपात बनवली आहे. ही मूर्ती डिजिटल रूपाने भक्तांशी संवाद साधते. त्यांना आशीर्वाद देते तसेच वैयक्तिक सल्लाही देते. एआय माझू सौम्य आवाजात भक्तांच्या प्रश्नांची उत्तरे देते. ही मूर्ती तंत्रज्ञान आणि श्रद्धेच्या एकतेचे प्रतीक आहे, असे येथील लोक म्हणतात. मंदिराने या मूर्तीला ‘जगातील पहिली एआय माझू’ म्हणून घोषित केले. माझूला मात्सू किंवा तियानहौ (स्वर्गाची राणी) म्हणूनही ओळखले जाते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List