इतिहासातून घेतला धडा; जबरदस्तीने लादलेला धर्म झुगारत विधीपूर्वक स्विकारला हिंदू धर्म
उत्तर प्रदेशातील वृंदावन येथील एका आश्रमात एका मुस्लिम कुटुंबातील आठ सदस्यांनी वैदिक विधींसह हिंदू धर्म स्वीकारला. कुटुंबातील सदस्यांनीही त्यांची नावे देखील बदलली आहेत. धर्मपरिवर्तनाचा हा निर्णय स्वेच्छेने घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशात ते चर्चेचा विषय बनले आहे.
उत्तर प्रदेशात राहणाऱ्या या कुटुंबातील प्रमुख झाकीर (50) यांनी धर्मांतर करून स्वत:चे नाव जगदीश ठेवले आहे. जगदीश यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी धर्मपरिवर्तनावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमचे पूर्वज मुघल काळापर्यंत हिंदू होते. यानंतर दबावाखाली येऊन त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. पण आज मी माझ्या स्वेच्छेने देवाची पूजा करत आहे. आम्ही कोणाच्याही दबावाखाली न येता स्वेच्छेने हिंदू धर्म स्विकारत आहोत, असे ते यावेळी म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश यांच्या कुटुंबात, त्यांची पत्नी, मुले, सुना आणि नातवंडे यांचा समावेश आहे. यासगळ्यांनी विधीवत हिंदू धर्माचा स्विकार केला आहे. धर्मांतरानंतर त्यांची नावेही बदलण्यात आली आहे. झाकीरचे नाव जगदीश, त्याची पत्नी गुड्डीचे नाव गुडिया, मोठा मुलगा अन्वरचे नाव सुमित, धाकट्या मुलाचे नाव रणवीरचे नाव रामेश्वर, सून साबिरा यांचे नाव सावित्री आणि नातवंडे – साबिर, झोया आणि नेहा यांचे नाव अनुक्रमे शत्रुघ्न, सरस्वती आणि स्नेहा असे बदलण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List