पँटीपासून ब्रापर्यंत… ‘हाउस अरेस्ट’ शोमध्ये अश्लीलतेचा कळस, सोशल मीडियावर संताप

पँटीपासून ब्रापर्यंत… ‘हाउस अरेस्ट’ शोमध्ये अश्लीलतेचा कळस, सोशल मीडियावर संताप

उल्लू या ओटीटी ॲपचा शो ‘हाउस अरेस्ट’ मोठ्या वादात अडकला आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या भागानंतर अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर या शोवर अश्लील कंटेन्ट दाखवल्याचा आणि अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. या शोवर बड्या नेत्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकजण सडकून टीका करताना दिसत आहेत. आता नेमकं प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया…

प्रियंका चतुर्वेदी यांनी मागितले उत्तर

खासदार आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या ‘हाउस अरेस्ट’ या रियालिटी शोमधील अश्लीलतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, त्यांनी हा मुद्दा संसदेच्या स्थायी समितीमध्येही उपस्थित केला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट लिहिली

प्रियंका यांनी सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर देखील पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, “मी समितीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे की उल्लू ॲप आणि ऑल्ट बालाजीसारखे प्लॅटफॉर्म अश्लील सामग्री असूनही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने लादलेल्या निर्बंधांपासून कसे वाचले आहेत. मी अजूनही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे.”

शोच्या क्लिप्सने सोशल मीडियावर व्हायरल

‘हाउस अरेस्ट’ हा शो उल्लू ॲपवर स्ट्रीम होत आहे आणि हा शो बिग बॉस रियालिटी शोच्या फॉरमॅटमध्ये बनवला गेला आहे. यात सहभागींना एका घरात बंद केले जाते, जिथे ते कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली राहतात. नुकताच शोच्या काही व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत, ज्यात स्पर्धक कॅमेऱ्यासमोर सेक्सच्या पोझिशन समजावताना आणि कपडे काढण्याच्या स्पर्धेत भाग घेताना दिसत आहेत. यापैकी काहींनी आपली पँट आणि काहींनी ब्रा काढली, ज्यामुळे शोवर अश्लीलता पसरवल्याचे गंभीर आरोप झाले आहेत.

एजाज खानही टीकेचे बळी

‘हाउस अरेस्ट’ या वादग्रस्त शोचे होस्ट आहेत एजाज खान. तो यापूर्वी बिग बॉस सीझन 7 मध्ये दिसला होता. याशोमध्ये तो दुसरा रनर-अप झाला होते. एजाजवरही सोशल मीडियावर तीव्र टीका होत आहे.

अश्लीलतेवर कधी बंदी येणार?

ओटीटी प्लॅटफॉर्मवर नियंत्रण आणि अश्लील सामग्रीच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. ‘हाउस अरेस्ट’ शोने पुन्हा एकदा या मुद्द्याला राष्ट्रीय चर्चेत आणले आहे. आता पाहायचे आहे की माहिती आणि प्रसारण मंत्रालय या प्रकरणात काय कारवाई करते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List