तुम लढो, हम कपडे सांभालते है, या भूमिकेला नेतृत्वगुण म्हणत नाहीत; संजय राऊत यांचा हल्लाबोल

तुम लढो, हम कपडे सांभालते है, या भूमिकेला नेतृत्वगुण म्हणत नाहीत; संजय राऊत यांचा हल्लाबोल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने ठोस भूमिका घेत कारवाई करण्याची गरज होती. देशातील सर्व जनतेसह विरोधी पक्षांनीही सरकारला पाठिंबा दिला आहे. मात्र, सरकारकडे राडकीय इच्छाशक्ती आणि प्रबळ नेतृत्वगुण नाही. त्याममुळे सर्व निर्णय हिंदुस्थानी लष्करावर सोडून पंतप्रधान निवडणूक प्रचार आणि इतर कार्यक्रमात रममाण होत आहे. या गंभीर घटनेनंतर आम्हीही सरकारला पाठिंबा दिला आहे. मात्र, आम्ही त्यांच्या चुकांना पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता सरकार या गंभीर मुद्द्याचे राजकारण करत आहे. अशा परिस्थितीत सरकारला समर्थन म्हणजे कमजोरीला समर्थन देण्यासारखे आहे, असा रोखठोक भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहबे ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांच्या भरवशावर बिहारमध्ये निवडणूक प्रचाराला जातात. तसेच गुरुवारी मुंबईत येत मनोरंजनाच्या विश्वास नऊ तास घालवले. दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी हे सर्व करू शकतात, याचे श्रेय लष्कराला द्यायला हवे. देशावर दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यात 27 जणांचा बळी गेला आहे. घटनेबाबत प्रत्येक देशावासियाच्या मनात संताप, आक्रोश आहे. अशी परिस्थिती असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येतात. मनोरंजन विश्वातील तारे-तारकांसोबत नऊ तास मजेत घालवतात. चेहऱ्यावर कोणीतीही चिंता, खेद काहीही नाही, याचे श्रेयही लष्कराला द्यायला हवे. आपले सैनिक देशासाठी मरायला तयार आहेत, त्यामुळे पंतप्रधान सर्वत्र फिरत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आतापर्यंत जे काही झाले आहे आणि जे काही होणार आहे, त्याचे श्रेय हिंदुस्थानी लष्कराचे आहे.मात्र, देशाचे नेतृत्त्व, सरकार हे पोकळ आहे. अशा कठीण प्रसंगात आमचा सरकारला पाठिंबा आहे. मात्र, गेल्या 10 वर्षात झालेल्या चुका पुन्हापुन्हा केल्या जात आहे. त्याचे आम्ही कधीही समर्थन करणार नाही. राजकीय इच्छाशक्ती आणि नेतृत्वक्षमता अशावेळी महत्त्वाची असते. तुम्ही करा, आण्ही तुम्हाला पूर्ण निर्णयस्वातंत्र्य दिले आहे. तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, श्रेयही मीच घेणार, मात्र काही गडबड झाली तर खापर तुमच्यावर फोडणार, तुम्हाला पूर्ण अधिकार दिले होते. अशा भूमिकेला राजकीय नेतृत्व म्हणू शकत नाही. त्यामुळे या काळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रकर्षाने आठवण होते. नेतृत्त्वगुण काय असतात, ते त्यांनी 1971 च्या युद्धात दाखवून दिले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

आपल्याला पाकिस्तानशी युद्ध करायचे आहे, तुमची तयारी काय आहे, असा थेट सवाल इंदिरा गांधी यांनी तत्कालीन लष्करप्रमुख सॅम माणकेशा यांना केला होता. तुमचे निर्णय तुम्ही घ्या, अशी भूमिका त्यांनी घएतली नव्हती. आपल्याला युद्ध करायचे आहे, तयारीला लागा, असे आदेश त्यांनी दिले होते. घरा घूसून मारण्याची भाषा करणारे आता कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. अशी भाषा करणारे आता तारेतारकांमध्ये गुतंले आहेत, ते कधी घुसणार आणि कधी मारणार, असा सवालही त्यांनी केला. देशात नेतृत्वाची गंभीर समस्या आहे आणि जनता टाळ्या वाजवत आहे. अशा घटनेनंतर 15 दिवस असे कार्यक्रम रद्द करण्याची गरज होती, फक्त देशाचा विचार करण्याची गरज होती. मात्र, देशाचे नेतृत्त्व याबाबत काहीच करत नाही आणि विरोधी पक्ष सरकारला पाठिंबा देत आहे, याला आपला ठाम विरोध असल्याचेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

उरी, पुलवामासारख्या घटना हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. त्यामुळे या घटनेबाबत काहीही बोलण्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अधिकार नाही. घटनेनंतर त्यांनी तातडीने राजीनामा देण्याची गरज होती. देशाचा विचार करता सर्वात आधी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. आता ते फक्त याला उत्तर देऊ, त्याला उत्तर देऊ, अशा घोषणा करत आहेत. आपले लष्करच आता जबरदस्त प्रत्यत्तर देईल, मात्र, तुमच्या चुकांचे फळ देश भोगत आहे. याची सत्ता पाडा, याचे आमदार, खासदार फोडा, याला, त्याला विकत घ्या, अशा कटकारस्थानात ते व्यस्त असतात. तेच त्यांचे काम आहे. त्यामुळे उरी, पुलवामा, पहलगाम येथील घटनांना देशाचे गृहमंत्री जबाबदार आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष सरकारला पाठिंबा देत आहे. सरकारला पाठिंबा द्या, मात्र सर्वात आधी गृहमंत्र्यांच्या राजीनामा मागा, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

आता ते फक्त घोषणा करत आहे. प्रत्युत्तर कधी देणार, याबाबत काहीही बोलत नाही. मुळात जे घडलंय त्याला गृहमंत्री जबाबदार आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची गरज आहे. ते राजीनामा देत नसतील तर प्रतप्रधानांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. याआधी भाजपने शिवराज पाटील यांचा राजीनामा मागितला होता, त्यांनीही तो दिला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. आम्ही सरकारला पाठिंबा दिला आहे. मात्र, आम्ही त्यांच्या चुकांना पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता सरकार या गंभीर मुद्द्याचे राजकारण करत आहे. अशा परिस्थितीत सरकारला समर्थन म्हणजे कमजोरीला समर्थन देण्यासारखे आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अभिनेता एजाज खानच्या अडचणी वाढल्या; थेट एफआयआर दाखल अभिनेता एजाज खानच्या अडचणी वाढल्या; थेट एफआयआर दाखल
एजाज खान आपल्या ‘अरेस्ट हाउस’ या रियालिटी शोमुळे वादात सापडला आहे. या शोचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत....
प्रसिद्ध गायक आतिफ असलम अडचणीत; भारत सरकारचा मोठा निर्णय, या गोष्टीवर थेट बंदी घातली
‘हाऊस अरेस्ट’ शोमुळे मोठा वाद, चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांची मागणी काय?
जेवण पाहाताच रहावत नाही कंट्रोल, Overeating पासून वाचण्याचे हे 6 उपाय आजमवा
तुम्ही खरेदी केलेले औषध खरं की बनावट कसे ओळखाल? वाचा सविस्तर
Jalgaon News – मासिक पाळीत स्वयंपाक केल्याने विवाहितेचा मानसिक छळ, त्रासाला कंटाळून महिलेने उचलले टोकाचे पाऊल
23 वर्षांची शिक्षिका 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळाली, म्हणाली पोटात त्याचेच बाळ; पोलीसही हैराण