‘छावा’ फेम अभिनेता लवकरच बनणार बाबा; चाहत्यांना दिली ‘गुड न्यूज’
विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटात छंदोगामात्य ऊर्फ कविकलश यांची दमदार भूमिका साकारलेला अभिनेता विनीत कुमार सिंह लवकरच बाबा होणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे.
विनीतने पत्नीसोबत खास फोटो पोस्ट करत लिहिलं, 'नवीन आयुष्य आणि आशीर्वाद. बाळ लवकरच येणार आहे. चिमुकल्याला बाळाला नमस्ते. आम्ही तुझं स्वागत करण्यासाठी सज्ज आहोत.'
याविषयी 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना विनीत म्हणाला, "आयुष्यातील हा टप्पा आम्हा दोघांसाठी खूपच खास आहे. आम्ही खूप खुश आहोत आणि बाळाच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. प्रत्येक गोष्ट आता नवीन वाटू लागली आहे आणि मला प्रत्येक क्षणाचा साक्षीदार व्हायचंय."
मी पत्नी रुचिराची काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. मी लवकरात लवकर काम आटपून घरी पळतो. तिच्यासोबत डॉक्टरांकडे जाता यावं यासाठी मी माझं शेड्युल ठरवलंय. जुलैमध्ये बाळाच्या जन्मानंतर मी पितृत्व रजेवर जायचा विचार करतोय", असंही त्याने सांगितलं.
विनीतने 2002 मध्ये संजय दत्तच्या 'पिता' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुरुवातील त्याच्या कामाला फारशी ओळख मिळाली नाही. नंतर अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'मधील भूमिकेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List