अजय देवगणने खरेदी केले कोट्यावधींचे खाजगी जेट? अजयने कराराबद्दल केला खुलासा
अजय देवगणचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘रेड 2’ अखेर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 1 मे रोजी प्रदर्शित झाला. रेड 2 हा 2018 च्या क्राईम थ्रिलर चित्रपट रेडचा सिक्वेल आहे. राजकुमार गुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा धाडसी आयकर अधिकारी अमय पटनायकची भूमिका साकारत आहे. चित्रपटात त्याची लढाई दादा मनोहर भाई (रितेश देशमुख) विरुद्ध दाखवण्यात आली आहे. जो एक भ्रष्ट राजकारणी आहे. रेडच्या रिलीज दरम्यान एका मुलाखतीत अजय देवगणने खुलासा केला की त्याच्याकडे 84 कोटींचे खाजगी जेट असल्याच्या चर्चेवर अखेर स्पष्टपणे सांगितलं आहे.
अजय देवगणने खरेदी केलं आहे कोट्यावधींचे खासगी जेट?
खरंतर 2010 मध्ये अशी चर्चा होती की अजय देवगणने 84 कोटी रुपयांचे खाजगी जेट खरेदी केले होते. त्यावेळी असे म्हटले जात होते की हा बॉलिवूडचा पहिला अभिनेताआहे ज्याचे स्वतःचे खाजगी जेट आहे. जरी, अजय देवगणने कधीही सार्वजनिकरित्या असा दावा केला नाही, परंतु ही चर्चा अजूनही लोकांमध्ये उत्सुकतेचा विषय आहे.अखेर इतक्या वर्षांनी अजय देवगणने याबद्दल खुलासा केला आहे.
अखेर अजयने सांगितलं खासगी जेटबद्दलचे सिक्रेट
अजयने एका मुलाखतीत सांगितले की यात काहीही तथ्य नाही. तो म्हणाला, “नाही, अजिबात नाही. मी ते खरेदी करण्याचा विचार करत होतो आणि एक करारही केला होता, पण तो झाला नाही. त्यामुळे हे खरं नाहीये”. पण अजयने पुढे हेही सांगितलं की त्याने 6 आसनी Hawker 800 एयरक्राफ्ट खरेदी करण्याचा विचार केला होता. जे तो वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी खरेदी करणार होता. पण काही कारणास्तव हा करार रद्द झाल्याचं त्याने सांगितलं.
‘रेड 2’ चित्रपटगृहात प्रदर्शित
अजय देवगणचा ‘रेड 2’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे आणि पहिल्या दिवशी त्याने 18.25 कोटी रुपये कमावले आहेत. आठवड्याच्या शेवटी चित्रपटाची कमाई वाढण्याची अपेक्षा आहे. यामध्ये तो अमय पटनायक म्हणून परतला आहे. ‘रेड 2’ मध्ये रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत आहे. जो अमय पटनायकशी स्पर्धा करताना दिसणार आहे. तर, वाणी कपूरने अमयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे, जी पहिल्या भागात इलियाना डिक्रूझने साकारली होती. चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्याही विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List