‘शोच्या नावाखाली मुलींकडून उतरवले कपडे’; अश्लील कंटेटविरोधात कारवाईच्या सूचना

‘शोच्या नावाखाली मुलींकडून उतरवले कपडे’; अश्लील कंटेटविरोधात कारवाईच्या सूचना

ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या अश्लील कंटेटवरून नेहमीच वाद निर्माण होतो आणि सोशल मीडियाद्वारे नेटकरी त्यावर आपली नाराजी व्यक्त करतात. अशाच एका अश्लील कंटेटविरोधात सध्या सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. अभिनेता एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोमधील एक क्लिप व्हायरल झाली आहे. याविरोधात अनेकांनी आवाज उठवला आहे. या गोष्टीची आता राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शोचं प्रसारण बंद करावं आणि संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने पोलीस महासंचालकांना दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबद्दलची माहिती दिली.

रुपाली चाकणकर यांचं ट्विट-

‘उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या ‘हाउस अरेस्ट’ या शोमध्ये होस्ट एजाज खान सहभागी महिला, पुरुषांना अश्लील प्रश्न विचारून आक्षेपार्ह प्रात्यक्षिक करून दाखवण्यास सांगत आहेत. महिलांना अंगावरील कपडे उतरविण्यास सांगून त्यासाठी प्रोत्साहन देत आहेत असे व्हिडियो समाज माध्यमातून समोर येत आहेत. याविषयी जनमानसातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने राज्य महिला आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या शोचे प्रसारण बंद करावे तसेच भारतीय न्याय संहिता, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा, माहिती प्रसारण कायदा व अनुषंगिक कायद्यान्वये संबंधितांवर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आयोगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिल्या आहेत,’ अशी माहिती त्यांनी दिली.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित एजाज खानच्या शोवर आक्षेप नोंदवला आहे. ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळी सूट देणं बंद केलं पाहिजे. एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोवर तात्काळ बंदी आणा. स्वत:ला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानच्या ‘हाऊस अरेस्ट’ या शोने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता उघडपणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे अत्यंत घाणेरडे आहेत. मी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती करते की उल्लू ॲपसह अशा आक्षेपार्ह कंटेट बनवणाऱ्या सर्व ॲप्सवर तात्काळ बंदी आणावी’, असं त्यांनी लिहिलंय.

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीसुद्धा एजाज खानच्या शोवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. ‘मी संसदेच्या स्थायी समितीत हा मुद्दा उचलला आहे की उल्लू ॲक आणि अल्ट बालाजीसारखे ॲप्स अश्लील कंटेटसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाद्वारे लावलेल्या निर्बंधांतून सुटण्यात यशस्वी ठरले आहेत. मी अजूनही त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा करतेय’, असं त्यांनी म्हटलंय. प्रियंका यांनी पुढे म्हटलंय की, ’14 मार्च 2024 रोजी माहिती व प्रसारण मंत्रालयाने 18 ओटीटी प्लॅटफॉर्मन्सा ब्लॉक केलं होतं, जे अश्लील आणि पॉर्नोग्राफिक कंटेट स्ट्रीम करताना पकडले गेले होते. यात आश्चर्यकारक पद्धतीने दोन सर्वांत मोठ्या ॲप्सना वगळण्यात आलं, ते म्हणजे- उल्लू आणि अल्ट बालाजी. याचं उत्तर मला माहिती व प्रसारण मंत्रालय देऊ शकेल का?’

‘हाऊस अरेस्ट’ या शोच्या व्हायरल क्लिपमध्ये एजाज खान स्पर्धकांना सेक्सचे विविध पोझिशन्स दाखवण्यास सांगतो. जेव्हा स्पर्धकाने सांगितलं की तिला याविषयी फारशी काही माहिती नाही, तेव्हा एजाज तिला म्हणतो, “तू कधी प्रयोग केले नाहीस का?” यावरून नेटकऱ्यांनी या शोवर आणि एजाजवर जोरदार टीका केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List