ED, CBIच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही, रमेश चेन्नीथला यांनी भाजपला ठणकावलं

ED, CBIच्या  कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही, रमेश चेन्नीथला यांनी भाजपला ठणकावलं

ईडी, सीबीआयच्या कारवायांनी मोदी सरकार काँग्रेसचा आवाज दडपू शकत नाही, असं म्हणत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

रमेश चेन्नीथला म्हणाले आहेत की, “केंद्रातील तानाशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केलेली आहे. मोदी-शहा अशा कारवाया करून काँग्रेस पक्षाला संपवू शकत नाहीत आणि अशा कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही उलट मजबूतपणे या हुकुमशाहीचा मुकाबला करू.”

रमेश चेन्नीथला म्हणाले की, “मोदी सरकारने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा आम्ही निषेध करतो. जनतेत या कारवाईबद्दल तीव्र रोष आहे. काँग्रेस पक्षाने या दडपशाही विरोधात काल व आज दोन दिवस देशभर आंदोलन केले, महाराष्ट्रातही विविध ठिकाणी आंदोलन करून भाजपा सरकारचा निषेध केला. मोदी शाह यांच्या सरकार विरोधात यापुढेही काँग्रेस पक्ष मजबूतीने लढा देईल.”

दरम्यान, मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ईडीच्या गैरवापराविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली दादर येथील इंडिया बुल्स जवळ आंदोलन केले. या आंदोलनात विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मेट्रो आणि समृद्धीला मोदींचा ‘थांबा’, पंतप्रधान आले… गेले, उद्घाटनांचा मुहूर्त टळला मेट्रो आणि समृद्धीला मोदींचा ‘थांबा’, पंतप्रधान आले… गेले, उद्घाटनांचा मुहूर्त टळला
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मुंबईत आले आणि ‘वेव्हज समिट’ला हजेरी लावून तेथूनच माघारी परतले. पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर असताना महाराष्ट्र दिनाच्या...
महामार्गावर कोंडीमारा! मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर, तब्बल 10 किलोमीटरच्या रांगा
मालवणमधील शिवपुतळ्याचे लोकार्पण लांबणीवर
संगममाहुली येथील महाराणी येसूबाई, रणरागिणी ताराराणी तसेच छत्रपती पहिले शाहू महाराज यांच्या समाधींचे जतन करा
सुप्रीम कोर्ट फक्त श्रीमंतांसाठी नाही! गुजरातच्या कंपनीला न्यायालयाने फटकारले
पोलिसांनी वर्षभरात 87 मुलांची मजुरीच्या दलदलीतून सुटका
अवयव प्रत्यारोपणासाठी आगाऊ नोंदणी हवी, हायकोर्टाची महत्त्वपूर्ण सूचना; राज्य शासनाला प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश