‘लग्नानंतर माझी रात्रीची झोप उडाली होती’, माधुरी दीक्षिने सांगितला डॉ. नेनेंसोबतचा लग्नानंतरचा अनुभव
बॉलिवूडची लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने. यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली. दोघेही बॉलिवूडमधील परिपूर्ण जोडप्यांपैकी एक आहेत. माधुरी आणि नेने यांचे लग्न 1999 मध्ये झाले होते. दोघांनाही दोन मुले आहेत आणि माधुरी तिच्या कामासोबत कुटुंबाची काळजी घेते. नेने देखील भारतात स्थलांतरित झाले आहेत.
माधुरीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे
नेनेशी लग्न केल्यानंतर माधुरीने चित्रपटांपासून स्वतःला दूर केलं. एवढंच नाही तर ती लग्नानंतर भारत सोडून थेट अमेरिकेला राहायला गेली. माधुरी आणि डॉक्टर नेने यांचे व्हिडीओ व्हायरल होतच असतात. आता माधुरीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने तिच्या लग्नातील कठीण दिवसांबद्दल सांगितले आहे.
माधुरीला एकटं वाटायचं….
तिच्या यूट्यूब चॅनलवर, माधुरीने खुलासा केला की तिचा वैवाहिक प्रवास खूप छान झाला असला तरी लग्नाचे सुरुवातीचे दिवस कठीण होते. नेनेंसोबत लग्न झाल्यानंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले होते. नेने हे हृदयरोगतज्ज्ञ आहेत. त्यामुळे ते सतत कामात असायचे. हॉस्पिटलमध्येच असायचे. त्यामुळे माधुरीला एकटं वाटायचं असही तिने म्हटलं आहे.
नेनेंबद्दल काय म्हणाली माधुरी?
डॉ. नेने कामावर असायचे तेव्हा ती घराची काळजी घ्यायची. नेने यांना जेव्हा जेव्हा वेळ असायचा तेव्हा तिला तिच्या कामात मदत करायचे. त्यावेळी संभाषणामध्ये नेने यांनी विनोदीत तिला म्हणताना दिसत आहे की, जेव्हा एक हृदयरोगतज्ज्ञ निवृत्त होतो तेव्हा त्याची पत्नी त्याला घराबाहेर काढते कारण तो घरातील सर्व कॅबिनेट व्यवस्थित करतो”
“ते रात्रभर काम करायचे….”
पुढे माधुरी म्हणाली, ‘जेव्हा आमचे लग्न झाले तेव्हा नेने कामासाठी फ्लोरिडामध्ये होते आणि आम्ही भेटून बरेच दिवस झाले होते. ते रात्रभर काम करायचे आणि घरी आल्यावर ते इतके थकायचे की ते जेवणही करत नसे आणि झोपी जायचे. मग पुढे डॉ. नेने म्हणाले, ‘तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सर्वोत्तम असायला हवे आणि त्यासाठी प्री मेडिकल रिक्वायरमेंट्स आवश्यक आहेत. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा माझी जनरल सर्जरी झाली होती आणि आम्हाला फ्लोरिडाला जावं लागलं. मी खूप काम केलं, पण फक्त एकच खंत आहे की मी माझ्या प्रियजनांसोबत जास्त वेळ घालवू शकलो नाही.”
नेनेंसोबत लग्न करण्याचा माधुरीचा अनुभव कसा होता?
त्यानंतर नेने माधुरीला विचारताना दिसतात की त्यांच्याशी लग्न करण्याचा तिचा अनुभव कसा होता? मग त्यावर माधुरीने म्हटलं, ‘ते दिवस खूप कठीण होते. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असायचात रत्यामुळे मलाही रात्री एकटे राहून एकटेपण जाणवायचं. नंतर झोपही उडाली होती. कारण तू मुलांची काळजी घेत होतात, त्यांना शाळेत घेऊन जात होतात आणि त्यांना परत आणतही होतात. पण ते सोडून इतर वेळी जेव्हा जेव्हा काही महत्त्वाचे क्षण होते तेव्हा तुम्ही तिथे नसायचे कारण तुम्ही हॉस्पिटलमध्ये असायचायत. कधीकधी मी आजारी असायचे, पण तूम्ही तेव्हाही नसायचा. कारण तुम्ही दुसऱ्याची काळजी घेत असायचा. पण मला नेहमीच तुमचा अभिमान आहे. घरी असतानाही तुम्ही सगळं सांभाळायचात. तुम्ही म्हणायचात, मला फक्त 4 तास झोपू दे आणि त्यानंतर तुम्ही सगळी काम करायचास” असं म्हणत तिने पती नेनेंचं कौतुक केलं आहे.
पुढे माधुरी असही म्हणाली, ‘लग्नापूर्वी माझ्या आयुष्यात फक्त काम होते. लग्नानंतर मला आयुष्य मिळाले.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List