रायगडातील कमी वजनाच्या नवजात बाळांना मिळणार जीवदान, अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात 14 खाटांचा अद्ययावत कक्ष

रायगडातील कमी वजनाच्या नवजात बाळांना मिळणार जीवदान, अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात 14 खाटांचा अद्ययावत कक्ष

मुदतीपूर्वी जन्माला आलेली मुले अनेकदा कमी वजनाची असतात. त्यामुळे त्यांच्यात श्वसन, तापमान नियंत्रण आणि रक्त गोठण्यास संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. मात्र आता रायगड जिल्ह्यातील कमी वजनाच्या नवजात बाळांना जीवदान मिळणार आहे. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात 14 खाटांचा स्वतंत्र माता नवजात शिशु देखभाल कक्ष तयार करण्यात आला असून अशा बाळांची येथे खास निगा राखली जाणार आहे. यामध्ये योग्य आहार, औषधे तसेच इनक्युबेटरची व्यवस्था असणार आहे. तसेच तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिकांचे चोवीस तास पथक तैनात असणार आहे.

कमी वजनाच्या बाळांमध्ये अनेक आरोग्य समस्या असू शकतात. काही मुलांमध्ये मेंदू आणि अवयवांचा पूर्ण विकास न झाल्यास त्यांना भविष्यात शिक्षणात आणि शारीरिक हालचालींमध्येही अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र खासगी रुग्णालयातील उपचार पद्धती महागडी असल्याने गोरगरीबांना अनके अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये बाळाच्या जीवालाही धोका पोहोचतो. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय आरोग्य दिनाचे औचित्य साधून अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या वतीने एक अनोखे पाऊल टाकण्यात आले आहे. माता बालसंगोपन या उद्देशाने जिल्हा रुग्णालयात माता नवजात शिशु देखभाल कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे कमी वजनाच्या व नाजूक बाळांना त्याच्या आईच्याच सहवासात ठेवून त्याची चांगल्या प्रकारे निगा राखणे आता सहज शक्य होणार आहे.

मातांना खास प्रशिक्षण दिले जाणार
कक्षात असणाऱ्या प्रत्येक मातेला व बालकाला लागणारी उपकरणे, कपडे व साधने यांनी हा कक्ष सुसज्ज केला आहे. या कक्षाची देखभाल व्यवस्थितरीत्या व्हावी याकरिता लागणाऱ्या परिचारिका, डॉक्टर यांचे पथक 24 तास या ठिकाणी असणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी-घुगे यांच्या हस्ते तसेच डॉ. सागर खेदू, परिचारिका, कर्मचारी यांच्या निदर्शनाखाली या नवीन कक्षाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे घरी गेल्यानंतर कमी वजनाच्या बाळांचे कसे संगोपन करता येईल यासाठी मातांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे.

इनक्युबेटर, वेळोवेळी तपासणी
कमी वजनाच्या बाळांवर उपचार करण्यासाठी 14 खाटा तसेच चार ते पाच इनक्युबेटर ठेवण्यात आले आहेत. बाळाला योग्य पोषण मिळावे यासाठी स्तनपान किंवा फॉर्म्युला आहार दिला जाणार आहे. गरज भासल्यास, सलाईनद्वारे किंवा नळीद्वारे आहार दिला जाणार आहे. गरज भासल्यास बाळाला आवश्यक औषधे दिली जातील. श्वसनक्रिया सुधारण्यासाठी किंवा संसर्ग टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD Weather update : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट; पुढील 5 दिवस धोक्याचे, आयएमडीचा हाय अलर्ट IMD Weather update : महाराष्ट्रावर मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट; पुढील 5 दिवस धोक्याचे, आयएमडीचा हाय अलर्ट
अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाऊस सुरूच आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा...
खऱ्या शाहरूखपेक्षा डुप्लिकेट शाहरूखचा थाट पाहाच; चाहत्यांची तुफान गर्दी,बॉडीगार्डही हैराण
सिद्धार्थ जाधवची करामत भारी, परीक्षेला गेला अन् चित्र काढून आला, तरी 35 मार्क कसे मिळाले?
बारावीत नापास झालेले बॉलिवूड स्टार, पण कमावतात कोट्यवधींची माया
सीता – पार्वती यांच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात दिसतात गॅमरस, चौथ्या अभिनेत्रीला पाहून व्हाल थक्क
ब्रँडेड की लोकल कूलर? निर्णय घेण्याआधी हे नक्की वाचा!
superfoods for kids: उन्हाळ्यात मुलांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात ‘या’ 5 सुपरफूड्सचा समावेश करा…