चौकशीसाठी आणलेल्या पतीची पोलीस ठाण्यात आत्महत्या, चिखली येथील घटनेने खळबळ

चौकशीसाठी आणलेल्या पतीची पोलीस ठाण्यात आत्महत्या, चिखली येथील घटनेने खळबळ

पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात आशा सेविका असलेल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने तिचा गळा दाबून खून केला. तसेच स्वतःही गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारांनंतर पोलिसांनी पतीला चौकशीसाठी चिखली पोलीस ठाण्यात आणले असता, त्याने स्वच्छतागृहात फरशी पुसण्याचे लिक्विड प्राशन करून आत्महत्या केली. हा खळबळजनक प्रकार शुक्रवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास घडला. आज मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

शरद रूपचंद चितळे (वय 33, रा. रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. कांचन शरद चितळे (वय 26) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. चितळे कुटुंबीय मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे. शरद चितळे हा खासगी कंपनीत वेल्डर म्हणून कामाला होता. त्याची पत्नी कांचन ही आशा सेविका होती. शरद हा चिखली येथे सासरे अशोक जेधे यांच्या इमारतीतील खोलीत पत्नी कांचन व सहा वर्षीय मुलगी परी यांच्यासोबत राहत होता. कांचन हिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरद याला संशय होता. त्यातून त्याने 13 एप्रिल रोजी राहत्या घरात कांचन झोपेत असताना शरदने मुलीसमोरच तिचा गळा आवळून खून केला तसेच त्याने स्वतःदेखील नायलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेतला. याबाबत माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शरद हा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले.
चिखली पोलिसांनी 16 एप्रिल रोजी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शरदची चौकशी केली असता, त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. त्याला शुक्रवारी सायंकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान, कांचन हिचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यात गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार पोलिसांनी शरद याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन नातेवाईकांसह चिखली पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी त्याने लघुशंकेचा बहाणा करून पोलीस ठाण्यातील स्वच्छतागृहाचा दरवाजा आतून बंद केला. बराच वेळ झाल्यानंतर आवाज देऊनही तो बाहेर न आल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. त्यावेळी शरद फरशी पुसण्याचे लिक्विड प्यायल्याचे निदर्शनास आले. त्याला नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान शनिवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.

‘सीआयडी ‘मार्फत तपास
पोलीस ठाण्यात किंवा पोलीस ठाण्याच्या आवारात मृत्यू झाल्याच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) संबंधित प्रकरणाचा तपास केला जातो. शरद चितळे याच्या आत्महत्या प्रकरणातदेखील ‘सीआयडी’कडून तपास करण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना भिडली, इतके जण जखमी Coastal Road Accident : कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना भिडली, इतके जण जखमी
मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. चार ते पाच वाहनांची एकमेकांना धडक लागल्याने हा अपघात झाला आहे. या भीषण...
“मंदिर खोदलं तर मशीद मिळेल, कुठपर्यंत खोदणार?”; प्रकाश राज यांनी मोदी सरकारला घेरलं
अबॉर्शन करण्यासाठी सर्वांनी…, लग्नाआधी गरोदर राहिलेल्या अभिनेत्रीचं दिग्गज क्रिकेटरसोबत अफेअर, पण…
शाहरुख खान त्याच्या मोकळ्या वेळेत घरी काय करतो? उत्तर जाणून वाटेल कौतुक
मी सती – सावित्री नाही, तारुण्यात सर्व काही…, गोविंदाच्या बायकोचा धक्कादायक खुलासा
कलिंगड खाताना चुकून बिया गिळल्या तर काय होते? जाणून घ्या
उन्हाळ्यात त्वचेची प्रत्येक समस्या दूर होईल, फक्त चेहऱ्याला लावा ‘हे’ घरगुती टोनर