‘…तर त्यांचं स्वागत’, राज, उद्धव ठाकरे युतीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

‘…तर त्यांचं स्वागत’, राज, उद्धव ठाकरे युतीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणं फार मोठी गोष्ट नाही असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरेंना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे राज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत? 

तिथेही ठाकरे आहेत. इथेही ठाकरे आहेत. दोघे भाऊ आहेत. हे नातं कायम आहे. काही राजकीय मतभेद झाले. त्यातून मार्ग वेगळे झाले असले तरी उद्धव ठाकरे यांचा मार्ग कायम महाराष्ट्र हिताचा राहिला आहे. राज ठाकरे यांचं विधान मी पण ऐकलं आहे.  उद्धव ठाकरे यांनीही ऐकलं. त्यांनी भूमिका मांडली. महाराष्ट्र हितासाठी जे काही वाद आहेत ते मिटवायला तयार आहोत. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, कोणताही वाद आणि भांडण नाही. असलं तर मिटवायला वेळ लागत नाही. फक्त भूमिका इतकीच आहे की, लोकसभा निवडणुकीवेळी, विधानसभेवेळी उद्धव ठाकरे हेच सांगत होते, या महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या फौजा आहेत. त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नये. २५ वर्ष आमची युती होती. त्यातला काही काळ राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यात सहभागी होते. पण महाराष्ट्राच्या मुळावरच घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा आम्हाला बाजूला व्हावं लागलं. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभा, विधानसभेवेळी आमची भूमिका होती की,  महाराष्ट्राच्या शत्रूंना कोणत्याही प्रकारे मदत होईल अशी भूमिका घेऊ नये. आपण अशा शक्तींबरोबर राहणं योग्य नाही, ते महाराष्ट्राला परवडणारं नाही. ही भूमिका आमची आजही आहे. उद्धव ठाकरे यांनी नम्रपणे सांगितलं आहे, आजही अशा शक्ती आहेत, ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्यामागून कारस्थानं सुरू आहेत. अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही. अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही. अशी भूमिका घेणं सर्वांनी गरजेचं आहे. ही भूमिका कोणी घेत असेल तर त्यांचं स्वागत आहे. त्यानंतर आम्ही चर्चेला तयार आहोत, आम्ही आमची पुढची भूमिका मांडू असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;