मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या विरोधात जैन सामाजाच्या आंदोलनास सुरुवात

मुंबईतील जैन मंदिर पाडल्याच्या विरोधात जैन सामाजाच्या आंदोलनास सुरुवात

मुंबईतील विलेपार्ले भागात असलेले जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महानगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी पाडले होते. मुंबई पालिकेच्या या कारवाईनंतर देशभरातील जैन समुदाय संतप्त झाला आहे. मुंबई मनपाच्या कारवाईविरोधात जैन समाजाकडून शनिवारी अहिंसक रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने जैन समाज बांधव सहभागी झाले. त्यांच्या हातात ‘मंदिर तुटा, हौसला नाही’, असे फलक होते. मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी या लोकांनी केली. रॅलीत स्थानिक सर्वपक्षीय नेतेसुद्धा सहभागी होणार आहे.

आरती करुन आंदोलनास सुरुवात

शनिवारी सकाळी ९.३० वाजता जैन समाजाकडून आंदोलन सुरु झाले. आंदोलनापूर्वी जैन बांधवांनी तोडलेल्या मंदिरामध्ये आरती केली. त्यानंतर आंदोलनास सुरुवात झाली. ‘मंदिर तुटा, हौसला नाही,’ असे फलक घेऊन जैन समाज बांधव रस्त्यावर उतरले आहे. मंदिर त्याच ठिकाणी हवे, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आंदोलनात भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा, काँग्रेस नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड, आमदार पराग अलवाणी यांच्यासह इतर स्थानिक नेते सहभागी होणार आहे.

मंदिर पुन्हा बांधून देण्याची मागणी

जैन समाजाच्या या आंदोलनात जैन समाजातील महिलासुद्धा मोठ्या संख्येने उतरल्या आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बीएमसीची कारवाई योग्य नसल्याचे म्हटले आहे. मनपाने केलेल्या कारवाईमुळे माफी मागावी आणि मंदिर पुन्हा बांधून द्यावे, अशी मागणी समाजबांधव करत आहे.

विले पार्ले भागातील नेमिनाथ कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी परिसरात 90 वर्ष जुने जैन मंदिर होते. हे मंदिर पाडण्यासाठी बीएमसीने नोटीस दिली होती. त्या विरोधात जैन समाज न्यायालयत गेला होता. कनिष्ठ न्यायालयाने जैन समाजाची याचिका फेटाळली. त्यानंतर जैन समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता बीएमसी प्रशासनाने घाई गर्दीत मंदिर पाडले, असा आरोप जैन समाजाकडून करण्यात येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;