भावाला न्याय मिळेपर्यंत चप्पल घालणार नाही, सरपंच संतोष देशमुख यांच्या बहिणीची प्रतिज्ञा

भावाला न्याय मिळेपर्यंत चप्पल घालणार नाही, सरपंच संतोष देशमुख यांच्या बहिणीची प्रतिज्ञा

सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे झालेली हत्या आजही अनेकांच्या अंगावर काटा आणते. आज उन्हात फिरताना मला त्रास होत आहे, मग त्या वेळी संतोषला किती यातना झाल्या असतील, असे सांगत डोळ्यात पाणी आणून त्यांची बहीण प्रियंका चौधरी यांनी, ‘‘जोपर्यंत भावाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण चप्पल घालणार नाही,’’ असा निर्धार केला आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सरपंच संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांचे कुटुंबीय पंढरीत आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना चौधरी यांनी, माझ्या भावाची 9 डिसेंबरला हत्या झाली होती, तेव्हापासून मी चप्पल सोडली आहे. आज मला चप्पल न घातल्यामुळे खूप त्रास होत आहे, मग संतोषला किती यातना झाल्या असतील, अशी आठवण काढून त्या रडू लागल्या. यामुळे मी विठुरायाला साकडे घातले आहे की, माझ्या भावाला न्याय मिळू दे. यामुळे त्याची मुले किमान चांगले शिक्षण घेतील. संतोषला न्याय मिळाल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही, असा निर्धार केल्याचे प्रियंका चौधरी यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

HSC Result – धाकधूक… धाकधूक… बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येणार? वाचा एका क्लीकवर… HSC Result – धाकधूक… धाकधूक… बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे पाहता येणार? वाचा एका क्लीकवर…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल सोमवारी (5 मे, 2025) ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार...
हिंदुस्थानशी युद्ध सुरू झाल्यास मी इंग्लंडला पलायन करणार; पाकिस्तानच्या खासदाराची उडाली भीतीनं गाळण
बनावट नोटा छापून चलनात आणल्या; भोपाळमध्ये डिलिव्हरी बॉयला अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अमृतसरमधून अटक, लष्कराची गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप
मी परवानगी घेऊनच लग्न केलं होतं, सीआरपीएफच्या जवानाने फेटाळले सर्व आरोप
आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा..
मी हिंदू, मी दलित..; पहलगाम हल्ल्यानंतर धर्माबद्दल काय म्हणाला ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेता?