Hingoli Accident – भरधाव डंपर भरबाजारात घुसला, नागरिकांना चिरडत रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू
हिंगोलीतील वसमत शहरात शनिवारी भीषण अपघाताची घटना घडली. माती वाहून नेणारा डंपर भरबाजारात घुसला आणि नागरिकांना चिरडत रिक्षाला धडकला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
वसमत शहरातील मदिना चौकात ही घटना घडली. वीटभट्टीसाठी माती वाहतूक करणारा डंपर बाजारात घुसला. नागरिकांना चिरडत रिक्षाला धडक देत डंपर थेट दुकानात शिरला. या अपघातात 5 ते 6 जण चिरडले गेले तर दोघांचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी वसमत येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय पथक घटनास्थळी दाखल झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List