Pahalgam Attack – बिथरलेल्या पाकिस्तानने केली बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी, ‘अब्दाली’ची रेंज 450 KM

Pahalgam Attack – बिथरलेल्या पाकिस्तानने केली बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी, ‘अब्दाली’ची रेंज 450 KM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर भूमिका घेत थेट कारवाईचा इशारा दिला आहे. हिंदुस्थानच्या सैन्याकडून लष्कर, नौदल आणि हवाई दलाने कुठल्याही क्षणी कारवाईसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट संकेतही दिले आहेत. यामुळे घाबरलेल्या आणि बिथरलेल्या पाकिस्तानने शनिवारी 450 किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या अब्दाली बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची घाईघाईत चाचणी घेतली.

अझरबैजान, चीन, तुर्की, बाकु पाकिस्तानच्या बाजूने

अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. सोनमियानी रेंज येथे ही चाचणी घेण्यात आली. ही चाचणी कदाचित पाकिस्तानच्या अणु-सक्षम क्षेपणास्त्र दलांचे निरीक्षण करणाऱ्या आर्मी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड (ASFC) अंतर्गत असलेल्या ऑपरेशनल युजर चाचण्यांचा एक भाग असल्याची शक्यता आहे.

पाकला दणका! क्रिकेटर, सेलिब्रिटीनंतर पंतप्रधानांवर हिंदुस्थानचा डिजिटल स्ट्राईक

अब्दाली वेपन सिस्टीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्षेपणास्त्राची चाचणी ‘एक्सरसाइज इंडस’ या सैन्य सरावाअंतर्गत करण्यात आली आहे. या चाचणीवेळी पाकिस्तानी सैन्यातील स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल मुहम्मद शाहबाज खान आणि स्ट्रॅटेजिक प्लॅन डिव्हिजनचे डीजी मेजर जनरल शहरयार परवेझ बट उपस्थित होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या राजनैतिक कृतींनंतर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र चाचणीचे संकेत देण्यात येत आहेत. NOTAM (Notice to Airmen) जारी करत आहे. हिंदुस्थानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने जाणूनबुजून हे शक्तिप्रदर्शन केल्याचे मानले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा.. आपल्या बरोबरची व्यक्ती पुढे जाऊ लागली की असुरक्षित वाटतं? अशोक सराफ यांची शिकवण लक्षात ठेवा..
एखाद्या श्रेत्रात आपल्या सोबतची व्यक्ती आपल्या पुढे जाऊ लागली की काहींना असुरक्षित वाटू लागतं. मग अशातून एकमेकांविषयी ईर्षा, द्वेष आणि...
मी हिंदू, मी दलित..; पहलगाम हल्ल्यानंतर धर्माबद्दल काय म्हणाला ‘बिग बॉस 18’ फेम अभिनेता?
आईसह तुझीही कोयत्याने खांडोळी करून टाकीन म्हणत अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार, नराधम बाप जेरबंद
समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील कुटुंबाला लुटले! गाडीसमोर आडवी गाडी लावली 12 लाखांच्या दागिन्यांची लूट
लांड्या लबाड्या करून निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली – संजय राऊत
12 दिवस होऊनही सरकारने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला नाही, संजय राऊत यांचा घणाघात
पाकड्यांच्या कुरापती सुरूच; सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार