महाराष्ट्रद्वेष्ट्या गुजराती तरुणाने केला छत्रपती शिवरायांचा घोर अवमान; अक्षयदीप विसावाडियाला अटक
महाराष्ट्र आणि मुंबईत मराठी माणसाच्या मुस्कटदाबीच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. मुंबईत राहयचे तर गुजराती बोलायला हवे, अशा धमक्याही अनेक गुजराती देत आहे. आता महाराष्ट्रद्वेष्ट्या एका गुजराती तरुणाने थेट छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकारक वक्तव्य केले आहे. अक्षयदीप विसावाडिया असे या गुजराती तरुणाचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
वसई तुळींज येथील अक्षयदीप विसावाडिया या गुजराती तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमानकराक वक्तव्य करत फुत्कार सोडले आहेत. गुजराती अक्षयदीपने केला छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अवमान केला आहे. शिवाजीने देश के लिए क्या किया? अपने ही देश को लूटा, असे संतापजनक विधान त्याने केले आहे. व्हाट्सअॅप ग्रुपवर त्याने हा आक्षेपार्ह आणि अवमानकारक मजकूर पोस्ट केला होता. याबाबत तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्रद्वेष्ट्या अक्षयदीपला अटक करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List