पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी श्रीलंकेत? चेन्नईतून गेलेल्या विमानाची कसून तपासणी
पहलगामचा हल्ला घडवणारे दहशतवादी गेले कुठे? याचा शोध अद्याप लागलेला नाही. याचदरम्यान शनिवारी कोलंबो विमानतळावर गुप्तचर यंत्रणेच्या अलर्टने खळबळ उडाली. पहलगामचा हल्ला घडवणारे संशयित दहशतवादी श्रीलंकन एअरलाईन्सच्या विमानात असल्याची गुप्त खबर कोलंबो विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली. त्या शक्यतेने चेन्नईतून कोलंबोत गेलेल्या श्रीलंकन एअरलाईन्सच्या UL 122 विमानाची कसून तपासणी करण्यात आली.
कोलंबोमध्ये विमानाची व्यापक सुरक्षा तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कोणतीही संशयास्पद व्यक्ती सापडली नाही. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या तपासणीमुळे सिंगापूरला जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला.
श्रीलंकन एअरलाईन्सने यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. 3 मे रोजी सकाळी 11.59 वाजता चेन्नईहून कोलंबो येथे पोहोचलेल्या फ्लाइट UL 122च्या आगमनानंतर व्यापक सुरक्षा तपासणी करण्यात आल्याचे एअरलाईन्सने म्हटले आहे.हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या गुप्त माहितीनंतर श्रीलंकेतील स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तपासणी केल्याचे एअरलाईन्सने स्पष्ट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List