पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाला जागा देण्यास 7 गावांचा विरोध, पोलिसांच्या लाठीमारामुळे महिलेचा हार्टॲटॅकने मृत्यू
पुरंदरच्या प्रस्तावित विमानतळाच्या ड्रोन सर्व्हेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. यात काही आंदोलक जखमी झाले असून यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रीया –
बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. शासनाने नागरीकांच्या भावना समजावून घेऊन योग्य ती पावले उचलणे आवश्यक होते. परंतु तेथे बळाचा वापर करण्यात आला ही बाब निश्चितच अतिशय दुःखद आहे. या घटनेत येथील नागरीक जखमी झाले ही बाब अतिशय वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी आहे. शासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन संयम व संवेदनशीलता दाखविणे आवश्यक होते. आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो. शासनाला आवाहन आहे की कृपया आपण हा विषय संवेदनशीलतेने हाताळावा, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List