Pahalgam Terror Attack : पाकिस्तानातून येणाऱ्या पोस्ट व पार्सल सेवेवर बंदी
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानातून येणाऱ्या पोस्ट व पार्सल सेवेवर बंदी
पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानसोबत आयात निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता हिंदुस्थानने पाकिस्तानातून येणाऱ्या पोस्ट व पार्सल सेवेवर बंदी घातली आहे. पोस्ट विभागाने एक पत्रक प्रसिद्ध करत ही माहिती दिली आहे. याचा परिणाम दोन्ही देशांमध्ये हवाई आणि जल मार्गाने होणाऱ्या आदान प्रदानावर होणार आहे.
या स्थगितीचा परिणाम आता दोन्ही देशातील पत्रव्यवहार, व्यावसायिक पार्सल आणि खासगी पत्रव्यवहारांवर होणार आहे. दोन्ही देशांतील आयात निर्यातीवर बंदी घातल्यानंतर काही तासात हा निर्णय देखील घेण्यात आला.
2019 ला पुलवामा हल्ल्यानंतरही पोस्ट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र तीन महिन्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List