कांदे बटाटे एकत्र ठेवू नका लगेच कुजतील! जाणून घ्या अजून कोणत्या भाज्या आणि फळे एकत्र ठेवू नयेत?

कांदे बटाटे एकत्र ठेवू नका लगेच कुजतील! जाणून घ्या अजून कोणत्या भाज्या आणि फळे एकत्र ठेवू नयेत?

फळे आणि भाज्या आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहेत. आपल्या स्वयंपाकघरात विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे ही कायम ठेवावीच लागतात. सर्व फळे आणि भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात. काही घरांमध्ये फळे आणि भाज्या दररोज किंवा आठवड्याभराच्या एकदा आणून ठेवल्या जातात. अशावेळी या भरपूर फळांची आणि भाज्यांची योग्य साठवणूक हा महत्त्वाचा भाग लक्षात घ्यायला हवा. खरंतर, काही फळे आणि भाज्या कधीही एकत्र ठेवू नयेत. असे केल्याने ते फळ किंवा भाजी खूप लवकर कुजण्यास आणि खराब होण्यास सुरुवात होते.

कोणती फळे आणि भाज्या एकत्र ठेवू नये
तुम्ही आणलेल्या भाज्या आणि फळांचे शेल्फ लाइफ वाढवायचे असेल, कोणती फळे आणि भाज्या एकत्र ठेवू नयेत हे जाणून घ्या.

बटाटे आणि कांदे एकत्र ठेवू नका
बहुतेक घरांमध्ये बटाटे आणि कांदे एकत्र ठेवले जातात. परंतु बटाटे आणि कांदे कधीही एकत्र ठेवू नयेत. असे केल्याने बटाटे लवकर अंकुरतात. कांदे कुजायला लागल्यावर, कांद्यातून इथिलीन वायू बाहेर पडतो. त्यामुळे बटाटे खूप लवकर खराब होण्यास सुरुवात होते. कांदे बटाटे एकत्र ठेवल्यामुळे बटाट्यांमधून ओलावा बाहेर पडतो. त्यामुळे कांदा लवकर कुजण्यास सुरुवात होते. म्हणून या कांदे बटाटे कधीही एकत्र ठेवू नयेत.

काकडी आणि टोमॅटो
आपण अनेकदा फ्रीजमध्ये भाजीपाल्या सोबत काकडी आणि टोमॅटो एकत्र ठेवतो. काकडी आणि टोमॅटो एकत्र ठेवल्यास ते लवकर खराब होऊ लागतात. टोमॅटोमधून बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूमुळे काकडी लवकर कुजण्यास सुरुवात होते.

स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी
उन्हाळ्यात येणारे स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी एकत्र ठेवण्याची चूक करू नये. स्ट्रॉबेरीमधूनही इथिलीन वायू बाहेर पडतो. ज्यामुळे ब्लूबेरी लवकर कुजू शकतात. दुसरीकडे, ब्लूबेरी वजनाने थोडी जड असतात, त्यामुळे स्ट्रॉबेरी खराब होण्याचा धोका निर्माण होतो.

 

पालेभाज्या आणि द्राक्षे
द्राक्षे कधीही हिरव्या पालेभाज्यांसोबत ठेवू नयेत. द्राक्षे इथिलीनचा चांगला स्रोत आहेत, त्यामुळे पालक कुजण्याची शक्यता असते. म्हणून पालेभाज्या आणि द्राक्षे एकत्र ठेवू नयेत.

ब्रोकोली आणि टोमॅटो
ब्रोकोली आणि टोमॅटो देखील एकत्र ठेवू नये. असे केल्याने ब्रोकोली लवकर पिवळी पडू लागते आणि त्याचे पोषणही कमी होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;