सोनिया गांधी व राहुल गांधींवरील ED कारवाई राजकीय सुडबुद्धीने, कारवायांनी काँग्रेस डगमगणार नाही – रमेश चेन्नीथला

सोनिया गांधी व राहुल गांधींवरील ED कारवाई राजकीय सुडबुद्धीने, कारवायांनी काँग्रेस डगमगणार नाही – रमेश चेन्नीथला

भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. याआधीही ईडीने सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली आहे. काँग्रेस पक्ष ईडी, सीबीआयच्या कारवायांना घाबरत नाही. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता एकजूट होऊन या कारवाईचा निषेध करेल, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.

नागपूर शहरात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी काँग्रेसने सद्भावना शांती मार्च काढला. आजच्या पदयात्रेत दिक्षाभूमी, ताजुद्दीन बाबा व टेकडी गणेश मंदिरात दर्शन घेऊन सद्भावनेचे साकडे घालण्यात आले. यावेळी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, जाती धर्माच्या नावावर सुरु असलेला भेदभाव थाबंवण्यासाठी काँग्रेसने सद्भावना यात्रा काढली असून अशा सद्भावना यात्रा राज्यभर काढल्या पाहिजेत. भाजपा जाती धर्माच्या नावाखाली भेदभाव करत आहे. नागपुरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असताना या शहरात हिंसाचार झाला त्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री तथा गृहमंत्री नागपूरचे आहेत तरीही त्यांना या घटनेची माहिती कशी मिळाली नाही? गुप्तचर विभागाने त्यांना माहिती दिली होती का? याचे उत्तर द्यावे लागेल आणि दंगलीची चाहुलच लागली नसेल तर हे गुप्तचर विभागाचे अपयश आहे. महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री यांनी या दंगलीची निष्पक्षपातीपणे चौकशी करुन दोषींना शिक्षा केली पाहिजे असेही रमेश चेन्नीथला म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला बिबटय़ाने पळविले आईच्या कुशीत झोपलेल्या बाळाला बिबटय़ाने पळविले
मेंढपाळ महिलेच्या कुशीत झोपलेल्या 11 महिन्यांच्या बाळाला बिबटय़ाने पळवल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दौंड तालुक्यातील दहिटणे येथे घडली. पुण्यातील रेस्क्यू टीम,...
बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये सीनियर निवासी डॉक्टरांकडून ज्युनिअर्सवर रॅगिंग,  तिघे तडकाफडकी निलंबित; चौकशीसाठी समिती
अपंगांसाठी केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, जगण्याच्या अधिकाराचा नव्याने अर्थ लावण्याची गरज
गंगोत्री-यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले, हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवर्षाव
बेस्ट दरवाढ पुढील आठवडय़ापासून, बेस्ट आणि रिजनल ट्राफिक अ‍ॅथोरेटीची झाली बैठक
देवेन भारती मुंबई पोलिसांचे नवे ‘बॉस’
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात मोठे बदल, मोदी सरकार ऍक्शन मोडमध्ये माजी रॉ प्रमुख आलोक जोशी अध्यक्ष