मृतांच्या टाळूवरील ‘धान्य’ खाणाऱ्या पालघरमधील रेशनधारकांना चाप बसणार, अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत व्यक्तींची नावे कट करणार

मृतांच्या टाळूवरील ‘धान्य’ खाणाऱ्या पालघरमधील रेशनधारकांना चाप बसणार, अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत व्यक्तींची नावे कट करणार

अनेक रेशनधारक अपात्र, दुबार तसेच स्थलांतरित असतानाही रेशनिंगच्या धान्यावर डल्ला मारतात. इतकेच नाही तर व्यक्ती मृत झाल्यावरही त्याचे नाव रेशनकार्डवरून कमी न करता धान्य घेतात. मात्र अशा रेशनधारकांना चाप बसणार आहे. सरकारच्या सूचनेनुसार पालघर जिल्ह्यातील तब्बल 7 लाख 42 हजार कुटुंबांचे रेशनकार्ड तपासली जाणार आहेत. यामध्ये अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत व्यक्तींच्या नावावर काट मारली जाणार आहे. रेशनकार्ड तपासणीची ही मोहीम जिल्हा पुरवठा शाखेकडून राबवली जात आहे.

पालघर, वसई, डहाणू, वाडा, विक्रमगड, तलासरी, जव्हार व मोखाडा या आठ तालुक्यांमधून अपात्र लाभार्थी रास्त धान्याचा लाभ घेत असल्याचे लक्षात घेत ही मोहीम आखण्यात आली आहे. रास्त धान्य दुकानातून विहित नमुन्यातील अर्ज दिल्यानंतर अर्ज भरून त्यासोबत रहिवास पुरावा म्हणून भाडे पावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी गॅस जोडणी क्रमांकाबाबत पावती, बँक पासबुक, विजचे देयक, टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन इतर), मतदार ओळखपत्र, आधारकार्ड तसेच दिलेला वास्तव्याचा पुरावा हा एक वषपिक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा असे नमूद करण्यात आले आहे. तसेच उत्पन्नसंदर्भात उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक असल्याचे पुरवठा विभागाने म्हटले आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शोधमोहिमेसाठी टीम तयार
फेब्रुवारी 2015 पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अन्नसुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटुंब योजना (PHH) अशा दोन गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आले आहे. शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये लाभार्थी संख्या उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यात 1 ते 30 एप्रिल या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोधमोहीम सुरू केली असून यासाठी खास टीम तयार करण्यात आल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उन्हाळ्यात ‘या’ भाजीचा रस शरीर ठेवतो थंड पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या उन्हाळ्यात ‘या’ भाजीचा रस शरीर ठेवतो थंड पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय, जाणून घ्या
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कारण या ऋतूत अनेकदा लोकांना थंड पेये आणि कोल्ड्रिंक्स पिणे आवडते, परंतु या...
Curly Hair Tips: उन्हाळ्यात कुरळे केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ 4 ट्रिक्स करा फॉलो
जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचाराचा मोठा विजय – हर्षवर्धन सपकाळ
CSK Vs PBKS – चहलची हॅट्रीक अन् श्रेयसची विस्फोटक फलंदाजी, पंजाबचा 4 विकेटने विजय; चेन्नई IPL मधून आऊट
अक्षयतृतीया निमित्त श्री विठ्ठलास आमरसाचा नैवेद्य, भाविकांनीही चाखली चव
Pahalgam Terror Attack हिंदुस्थानचा मोठा निर्णय, पाकिस्तानी विमानांसाठी एअरस्पेस केला बंद
‘शरद पवार आधी बोलले पहलगाम हल्ल्याशी धर्माचा संंबंध नाही, मग फडणवीसांनी…’, शहाजीबापू पाटील यांचं मोठं वक्तव्य