धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचे करुणा शर्मांकडे कोणते पुरावे? यादीच समोर

धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचे करुणा शर्मांकडे कोणते पुरावे? यादीच समोर

मोठी बातमी समोर येत आहे, करुणा शर्मा यांनी पोटगी संदर्भात जी याचिका केली होती, त्या प्रकरणात न्यायालयानं सुनावणीसाठी पुढील तारीख दिली आहे. या प्रकरणात आता येत्या पाच एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये न्यायाधिशांनी काही पुरावे सादर करण्यास सांगतिलं आहे. ते पुरावे आम्ही येणाऱ्या पाच तारखेला सादर करणार आहोत, असं यावर बोलताना करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मी आज पुरावे सादर करू शकले नाही, कारण माझ्या वकिलांचा काहीतरी गैरमसज झाला होता. तसेच गेल्या तीन ते चार दिवसांपासून माझी तब्येत  बरोबर नाही. त्यामुळे मी देखील लक्ष दिलं नाही. मात्र पुढच्या सुनावणीला मी स्वत: लक्ष देऊन सर्व पुरावे सादर करणार आहे. जसं की आमचं जॉइंट अकाउंट आहे, एचडीएफसी बँकमध्ये, धनंजय मुंडे यांची एक कोटी रुपयांची बजाजची पॉलिसी आहे, ज्यावर पत्नी म्हणून मी नॉमिनी आहे.  त्यांनी जे स्विकृती पत्र लिहून दिलं आहे, त्यावर देखील मी बायको म्हणून आहे, अशी माहिती यावेळी करुणा शर्मा यांनी दिली आहे.

दरम्यान कोर्टात युक्तिवाद करताना धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी असा दावा केला की, करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी नाहीत परंतु ती जी दोन मुलं आहेत ती धनंजय मुंडे . यांची आहेत. यावर उत्तर देताना करुणा शर्मा यांनी म्हटलं की, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. या युक्तीवादावर न्यायाधिशांना देखील हसू आवरलं नाही. न्यायाधिशांनी स्वत: म्हटलं जर मुलं तुमची आहेत तर पत्नी नाही असं कसं होईल. मी याबाबतचे सर्व पुरावे येत्या पाच तारखेला कोर्टात सादर करणार आहे, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात असा देखील दावा केला की, करुणा शर्मा या आर्थिकदृष्या सक्षम आहेत. त्यांच्या अनेक कंपन्या आहेत. ते इनकम टॅक्स देखील भरतात. त्यांनी निवडणूक देखील लढवली, त्यामुळे त्यांना पोटगीची गरज नाही. यावर देखील करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडूक लढण्यासाठी फक्त दहा हजार रुपयांच्या डीडीची गरज असते, आणि त्या निवडणुकीमध्ये मी काही खूप मोठा खर्च केलेला नाहीये. आणि ज्या कंपन्यांचा उल्लेख केला आहे, त्या कंपन्या पाण धनंजय मुंडे यांच्याच आहेत.  त्या कंपन्या आज बंद पडल्या आहेत. 2016 पासून त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाहीये.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शरीराच्या वजनानुसार रोज किती पाणी प्यायला हवं? फायदे जाणून आश्चर्य वाटेल शरीराच्या वजनानुसार रोज किती पाणी प्यायला हवं? फायदे जाणून आश्चर्य वाटेल
डॉक्टरांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत अनेकांच्या तोंडातून आपण हे ऐकलं असेल की पाणी पिणे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे असते. पण ते पाणी...
लघवीत वारंवार फेस दिसतोय, दुर्लक्ष करू नका; किडनीबाबत शरीर देतंय गंभीर संकेत, निकामी होऊ शकतं किडनी
पाथर्डीत विदेशी दारू जप्त
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीला कात्री, गरजेपेक्षा 20 टक्क्यांनीही कमी निधी
Maharashtra Monsoon Session 2025 – हे सरकार किती बेमुर्वतखोर आहे, या सरकारला शेतकऱ्यांविषयी कणव नाही; भास्कर जाधव यांची टीका
पॅनिक अटॅक आला आणि त्याने इनहेलर दिलं, यानंतर साधला डाव; कोलकाता अत्याचार प्रकरणात पीडितेचा जबाब
‘रिअल लाईफ पॅड मॅन!’ ग्रामीण भागातील मुलींच्या आरोग्यासाठी अर्जुन देशपांडेंची धडपड