झोपडपट्टय़ांच्या कंत्राटदाराकडून स्वच्छतेचा उपक्रम गुंडाळणार; कंत्राटदार मिळेना, निविदेला पाचव्यांदा मुदतवाढ

मुंबईतील झोपडपट्टय़ांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार नेमण्याचा पालिकेचा उपक्रम आता गुंडाळण्याची शक्यता आहे. कारण पंधराशे कोटींच्या कामासाठी चार वेळा निविदा मागवूनही कंत्राटदारच समोर येत नसल्याने आता पाचव्यांदा निविदा मागवण्यात आल्या आहेत. यानुसार 31 एप्रिलपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.

दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात 60 टक्के मुंबईकर झोपडपट्टीत वास्तव्य करतात. त्यामुळे झोपडपट्टी कचरा मुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या धोरणानुसार विशेषतः झोपडपट्टीतील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डंपिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी, स्वच्छतागृहांची, गटारांची स्वच्छता कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे. यासाठी पहिल्यांदा 15 फेब्रुवारी रोजी निविदा मागवण्यात आल्या. परंतु निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने 11 मार्च रोजी मुदतवाढ एक आठवडय़ाची मुदतवाढ दिली. मात्र त्या वेळीही प्रतिसाद न मिळाल्याने 18 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र या वेळी कोणच कंत्राटदार पुढे न आल्याने 25 मार्चपर्यंत पुन्हा एकदा मुदतवाढ दिली. मात्र तिसऱयांदा निविदा प्रक्रियेला 3 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली तरीही पंत्राटदार पुढे येत नसल्याने चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र पंत्राटदार समोर येत नसल्याने आता पाचव्यांदा निविदा मागवण्यात आली आहे.

अशी राहणार पंत्राटदारांवर जबाबदारी

 n झोपडपट्टी भागातील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डंपिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात येईल. n झोपडपट्टी वस्तीमधील गल्ल्यांची सफाई, छोटय़ा गटारांची सफाईची जबाबदारी त्याच कंत्राटदारावर राहील. n झोपडपट्टी भागातील  स्वच्छतागृहांची स्वच्छता दिवसातून दोन ते तीन वेळा कारवी लागेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेत्री राहिली गरोदर, करियरला ब्रेक, मिळाला धोका संपलं स्टारडम वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेत्री राहिली गरोदर, करियरला ब्रेक, मिळाला धोका संपलं स्टारडम
आताच्या काळात फक्त अभिनेत्रीच नाहीतर, सामान्य मुली देखील लग्न करण्याआधी करियरचा विचार करतात. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री...
हेमा मालिनी यांच्यामुळे नातेवाईकांवर आली वाईट वेळ? भाचीकडून खंत व्यक्त
भन्साळी संतापल्यावर सेटवर 25 कुत्रे आणले जायचे अन्..; फरदीन खानने सांगितला किस्सा
उर्फीच्या ड्रेसने सर्वांचीच मनं जिंकली; समंथानेही कमेंट करत लिहिलं..
मला शाहरुखपेक्षा जास्त पैशांची ऑफर होती पण..; निवडणूक रॅलीदरम्यान पवन कल्याणचं वक्तव्य
ऋषी कपूर यांची ‘ही’ अभिनेत्री प्रसिद्ध क्रिकेटपटूची सासू, तिसऱ्या पतीसोबत जगतेय रॉयल आयुष्य
सोनाली बेंद्रेला पाहताच जया बच्चन यांनी फिरवलं तोंड? व्हिडीओवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन