मला शाहरुखपेक्षा जास्त पैशांची ऑफर होती पण..; निवडणूक रॅलीदरम्यान पवन कल्याणचं वक्तव्य

मला शाहरुखपेक्षा जास्त पैशांची ऑफर होती पण..; निवडणूक रॅलीदरम्यान पवन कल्याणचं वक्तव्य

जनसेनाचे संस्थापक आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पवन कल्याण सध्या चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तो आंध्रप्रदेशमध्ये प्रचार करत आहे. नुकत्याच एका रॅलीदरम्यान त्याने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा उल्लेख केला. यामुळे पवन कल्याणचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. “पैशांसाठी मी कधीच माझ्या मूल्यांशी तडजोड करत नाही”, असं तो म्हणाला. एका जाहिरातीसाठी शाहरुख खानपेक्षा जास्त पैशांची ऑफर मला मिळाली होती, मात्र जनहिताचा विचार करून मी ती नाकारली, असा खुलासा पवन कल्याणने रॅलीमध्ये केला.

पवन कल्याण या रॅलीदरम्यान म्हणाला की, 2000 मध्ये त्याला समजलं की एक सॉफ्ट ड्रिंक लोकांच्या आरोग्यासाठी ठीक नाही. या सॉफ्ट ड्रिंकमुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, हे समजताच त्याची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला. “कोला ब्रँडने मला त्यांच्या सॉफ्ट ड्रिंकची जाहिरात करण्यासाठी मोठी रक्कम ऑफर केली होती. मात्र मी त्यात जराही रस दाखवला नाही. मला शाहरुख खानपेक्षा जास्त पैशांची ऑफर मिळाली होती. पण मी माझ्या सिद्धांतांना प्राधान्य दिलं. अशा पद्धतीने पैसे कमावण्यात मला अजिबात रस नाही”, असं तो पुढे म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawan Kalyan (@pawankalyan)

पवन कल्याणचा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठा चाहतावर्ग आहे. 2008 मध्ये त्याने राजकारणात प्रवेश केला. 2014 मध्ये त्याने जनसेना पार्टीची स्थापना केली. पवन कल्याण हा मेगास्टार चिरंजीवीचा लहान भाऊ आहे. भावाच्या पक्षासाठी चिरंजीवी यांनीसुद्धा जनतेला आवाहन केलं आहे. नुकताच त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते त्यांच्या छोट्या भावाला मत देण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. “माझा छोटा भाऊ लोकांच्या सेवेसाठी आपल्या पैशांचा वापर करत आहे. त्याच्यावर तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या”, असं ते म्हणाले. दुसरीकडे अभिनेता नानी यानेसुद्धा एक पोस्ट लिहित पवन कल्याणला समर्थन दर्शविलं आहे.

2008 मध्ये पवन कल्याणने भाऊ चिरंजीवी यांच्या प्रजा राज्यम पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश केला. परंतु हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर त्याने तो पक्ष सोडला. मार्च 2014 मध्ये पवन कल्याणने जनसेना पक्षाची स्थापना केली. त्यावेळी हा पक्ष गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

… तर अशी शिक्षा करू की संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल, राहुल गांधी यांचा इशारा … तर अशी शिक्षा करू की संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल, राहुल गांधी यांचा इशारा
उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाचा भाजपला आठ वेळा मतदान केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून...
पुढील पाच दिवस देशात उष्णतेचा कहर, हवामान विभागाचा इशारा
Video एकाच व्यक्तीने 8 वेळा दिले भाजपला मत, काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ
Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : 2014 मध्येच महाविकास आघाडी बनवण्याचा प्लॅन, शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
पुढारी कसे न लाजता मत मागतात, तसंच काहीसं…; अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट चर्चेत
Lok Sabha Election 2024 : मुंबईतलं भाषिक गणित काय सांगतं? नेमकं राजकीय समीकरण काय?
Health : रोज सकाळी ब्रेड खात असाल तर सावधान, शरीराचं भयंकर नुकसान