उर्फीच्या ड्रेसने सर्वांचीच मनं जिंकली; समंथानेही कमेंट करत लिहिलं..

उर्फीच्या ड्रेसने सर्वांचीच मनं जिंकली; समंथानेही कमेंट करत लिहिलं..

नुकताच ‘मेट गाला 2024’ हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कार्यक्रम पार पडला. मेट गालाच्या रेड कार्पेटवर विविध देशांतील नामांकित सेलिब्रिटी अत्यंत फॅशनेबल कपड्यांमध्ये दिसून येतात. या रेड कार्पेट लूकची सोशल मीडियावर खूप चर्चा होते. मात्र यंदा ‘मेट गाला’च्या आधीच अभिनेत्री उर्फी जावेदच्या फॅशनची जोरदार चर्चा झाली. इतकंच काय तर उर्फीचा हा अनोखा आणि अत्यंत कल्पकतेने डिझाइन केलेला हा ड्रेस पाहून तिलाच ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर पाठवण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली. उर्फीच्या या ड्रेसने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. केवळ टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभसुद्धा उर्फीच्या ड्रेसचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही.

गेल्या आठवड्यात उर्फी तिच्या नव्या लूकमध्ये जेव्हा पापाराझींसमोर आली, तेव्हा सर्वजण चकीत झाले होते. तिने काळ्या रंगाचा मोठा गाऊन परिधान केला होता आणि त्यावर पाना-फुलांची डिझाइन होती. सुरुवातीला अगदी सर्वसामान्य दिसणाऱ्या या ड्रेसची खरी जादू जेव्हा उर्फीने सर्वांना दाखवली, तेव्हा सर्वजण बघतच राहिले. फोटो आणि व्हिडीओ शूट करण्यासाठी पापाराझी जेव्हा तयार झाले, तेव्हा उर्फीने त्यांना सांगितलं की, ती एक जादू दाखवणार आहे. तिने टाळ्या वाजवण्यास सुरूवात करताच तिच्या ड्रेसवरील पाना-फुलांच्या डिझाइनमधून कागदी फुलपाखरू उडून खाली पडले. त्यानंतर पुन्हा ती पानं आणि फुलं पूर्ववत झाली. उर्फीचा हा जादुई ड्रेस सर्वांनाच खूप आवडला.

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

उर्फीच्या या ड्रेसचं सर्वसामान्य नेटकऱ्यांनी तर कौतुक केलंच आहे. याशिवाय टीव्ही अभिनेता अली गोणी, सोफी चौधरी यांनीसुद्धा तिची प्रशंसा केली. ‘काही म्हणा, पण ही मुलगी मेहनत खूप करते’, असं एका नेटकऱ्याने लिहिलं. तर ‘पहिल्यांदा उर्फीने खूप सुंदर ड्रेस परिधान केला आहे आणि पहिल्यांदाच ती स्वत:सुद्धा सुंदर दिसतेय’, असं दुसऱ्याने म्हटलं. ‘मेट गाला, तुमचं खूप नुकसान झालंय’, असंही एका युजरने लिहिलं आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसुद्धा उर्फीच्या या ड्रेसचं कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नाही. समंथाने उर्फीचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आणि त्यावर लिहिलं, ‘सुंदर!’

उर्फी लवकरच ‘फॉलो कर लो यार’ या शोमध्ये झळकणार आहे. प्राइम व्हिडीओ इंडियावर हा शो स्ट्रीम होणार आहे. संदीप कुकरेजाने या शोचं दिग्दर्शन केलं आहे. उर्फीने नुकतंच दिबाकर बॅनर्जीच्या ‘लव्ह सेक्स और धोका 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;