ऋषी कपूर यांची ‘ही’ अभिनेत्री प्रसिद्ध क्रिकेटपटूची सासू, तिसऱ्या पतीसोबत जगतेय रॉयल आयुष्य

ऋषी कपूर यांची ‘ही’ अभिनेत्री प्रसिद्ध क्रिकेटपटूची सासू, तिसऱ्या पतीसोबत जगतेय रॉयल आयुष्य

दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अशाच सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे ‘नसीब अपना अपना…’, 1986 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत अभिनेत्री फलक नाझ आणि राधिका सरतकुमार यांनी मुख्य भूमिका साकारली होती. राधिका सरतकुमार यांच्या भूमिकेला मात्र चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पतीच्या घरात मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या रिधाका यांनी चंदो या भूमिकेला न्याय दिला होता. आता राधिका सरतकुमार अभिनयापासून दूर असल्यातरी राजकारणात सक्रिय आहेत.

राधिका यांनी तामिळ सिनेविश्वातून अभिनय विश्वात पदार्पण केलं. बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्रीने महानायक अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली. पण बॉलिवूडमध्ये राधिका यांना हवं तसं यश मिळवता आलं नाही. राधिका बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्यातरी, चंदो म्हणून आजही चाहत्यांच्या मनात आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by @radhika_sarathkumar

 

राधिका सरतकुमार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्या भाजप पक्षातून निवडणूक लढवत आहेत. वेळेनुसार राधिका सरतकुमार यांच्या लूकमध्ये देखील फार बदल झाले आहे. अनेकदा राधिका सरतकुमार यांना प्रचार करताना देखील स्पॉट करण्यात आलं आहे.

राधिका सरतकुमार यांचं खासगी आयुष्य

राधिका सरतकुमार यांच्याबद्दल यांनी पहिलं लग्न 1985 मध्ये अभिनेते – निर्माते प्रताप पोथेन यांच्यासोबत केलं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर राधिका यांनी दुसरं लग्न ब्रिटीश रिचर्ड हार्डी यांच्यासोबत केलं. लग्नानंतर राधिका भारत सोडून लंडन येथे देखील जाणार होत्या.

पण राधिका सरतकुमार यांचं दुसरं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. राधिका सरतकुमार आणि रिचर्ड हार्डी यांना एक मुलही देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव रायने असं आहे. रायने हिने भारतीय क्रिकेटर अभिमन्यू मिथून याच्यासोबत केलं आहे. अभिमन्यू हा राधिका सरतकुमार यांचा जावई आहे.

दुसरं लग्न देखील अपयशी ठरल्यानंतर राधिका सरतकुमार यांनी तिसरं लग्न अभिनेते आणि राजकारणी आर.सरतकुमार यांच्यासोबत केलं. राधिका आणि आर.सरतकुमार यांना दोन मुलं आहेत. आता राधिका सरतकुमार तिसऱ्या पतीसोबत रॉयल आयुष्य जगत असून निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;