वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेत्री राहिली गरोदर, करियरला ब्रेक, मिळाला धोका संपलं स्टारडम

वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेत्री राहिली गरोदर, करियरला ब्रेक, मिळाला धोका संपलं स्टारडम

आताच्या काळात फक्त अभिनेत्रीच नाहीतर, सामान्य मुली देखील लग्न करण्याआधी करियरचा विचार करतात. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री फार कमी वयात लग्नबंधनात अडकायच्या. अशात करियरच्या उच्च शिखरावर पोहोचण्यापूर्वीच अभिनेत्रींच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी यायची. ज्यामुळे अभिनेत्रींना करियर सोडून पूर्ण लक्ष कुटुंबाला द्यावा लागला. असंच काही बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत झालं आहे. वयाच्या 15 व्या वर्षी अभिनेत्री 30 वर्षीय अभिनेत्यासोबत लग्न केलं आणि गरोदर राहिली. लग्नानंतर अभिनेत्रीच्या करियरला ब्रेक लागला आणि तिचं स्टारडम देखील संपलं.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाहीतर, अभिनेत्री डिंपल कपाडिया आहे. आजही डिंपल कपाडिया यांच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. डिंपल कपाडिया तुफान चर्चेत आल्या जेव्हा त्यांनी 15 वर्ष मोठे अभिनेते राजेश खन्ना यांना डेट करण्यास सुरुवात केली.

काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी 1973 मध्ये लग्न केलं. तेव्हा डिंपल 15 वर्षांच्या होत्या, तर राजेश खन्ना 30 वर्षांचे होते. मोठ्या शाही थाटात दोघांचा लग्न सोहळा पार पडला. लग्ननंतर डिंपल प्रेग्नेंट राहिल्या आणि ‘बॉबी’ सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

‘बॉबी’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट ठरला. चाहत्यांनी सिनेमाला आणि डिंपल यांना भरभरुन प्रेम दिलं. पण राजेश खन्ना यांनी सांगितल्यानंतर डिंपल यांनी बॉलिवूडचा निरोप घेतला. यशाच्या शिखरावर असताना डिंपल यांनी 1973 मध्ये मुलीला जन्म दिला. वयाच्या 16 व्या वर्षी डिंपल आई झाल्या…

लग्नाच्या काही वर्षांनंतर राजेश खन्ना – डिंपल कपाडिया यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक चढ उतार येवू लागले. अखेर 1982 मध्ये दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत डिंपल म्हणाल्या होत्या, ‘ज्या दिवशी माझं आणि राजेश यांचं लग्न झालं, तेव्हा आमच्या आनंदाचा देखील शेवट झाला..’ डिंपल यांनी राजेश खन्ना यांच्यावर फसवणुकीचे देखील आरोप लावले होते.

राजेश खन्ना यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर डिंपल यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 1984 साली प्रदर्शित झालेल्या ‘सागर’ सिनेमातून डिंपल यांनी पुन्हा करियरला सुरुवात केली. डिंपल यांच्यासोबत ‘सागर’ सिनेमात अभिनेते ऋषी कपूर होते. पुढच्या 10 वर्षात डिंपल यांनीने ‘अर्जुन’, ‘जांबाज’, ‘इंसाफ’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये काम केलं आणि बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीचा दर्जा मिळवला.

अद्यापही डिंपल बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहते देखील डिंपल यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;