भन्साळी संतापल्यावर सेटवर 25 कुत्रे आणले जायचे अन्..; फरदीन खानने सांगितला किस्सा

भन्साळी संतापल्यावर सेटवर 25 कुत्रे आणले जायचे अन्..; फरदीन खानने सांगितला किस्सा

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे त्यांच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांमधील भव्यदिव्य सेट, कलाकारांचे भरजरी पोशाख आणि अत्यंत बारकाईने डिझाइन केलेली प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. नुकतंच त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. ‘हिरामंडी’ ही त्यांची वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजिदा शेख, रिचा चड्ढा, फरदीन खान, शेखर सुमन, अध्ययन सुमन यांसारख्या कलाकारांची मोठी फौजच पहायला मिळते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या कलाकारांनी दिग्दर्शक भन्साळींच्या स्वभावाविषयी बरंच काही सांगितलं.

सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती राव हैदरीने सांगितलं की, भन्साळींना कुत्र्यांविषयी फार प्रेम आहे. याच मुलाखतीत फरदीन खानने एक किस्सा सांगितला. “जेव्हा कधी ते एखाद्या गोष्टीबद्दल चिडायचे किंवा संतापायचे, तेव्हा त्यांचे सहाय्यक दिग्दर्शक हिरामंडीच्या सेटवर 25 कुत्रे पाठवायचे. ज्याक्षणी हे कुत्रे सेटवर यायचे, त्याच्या दुसऱ्याच क्षणी ते अत्यंत शांत व्हायचे”, असं फरदीनने सांगितलं. त्यांच्याविषयी अशी एखादी गोष्ट जी सहसा लोकांना माहित नाही, ती कोणती असा प्रश्न अभिनेत्री संजीदा शेखला विचारण्यात आला होतं. तेव्हा तिने सांगितलं, “ते दिवसातून तीन ते चार वेळा त्यांचा कुर्ता बदलायचे आणि प्रत्येक वेळी जेव्हा ते कुर्ता बदलून यायचे, तेव्हा त्यांच्या डोक्यात नवीन विचार, नवीन कल्पना असायची.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

या सीरिजमध्ये भन्साळींच्या भाचीनेही भूमिका साकारली आहे. शर्मिन सेहगल असं तिचं नाव असून तिनेसुद्धा शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला. “आम्हाला एक सीन शूट करायचा होता, ज्यामध्ये मला रडायचं होतं. हा सीन शूट करण्यासाठी आम्हाला चार दिवसांचा अवधी लागला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला रडायचं होतं. त्यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजता शूटिंग संपेपर्यंत मी रडतच होती. चौथ्या दिवशी, माझे डोळे बटाट्यासारखे सुजले होते”, असं तिने सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;