कपाटात गेलेली त्यांची फाईल उद्या कधीही बाहेर काढली जाईल ;शरद पवार यांचा अजितदादा गटाला इशारा

कपाटात गेलेली त्यांची फाईल उद्या कधीही बाहेर काढली जाईल ;शरद पवार यांचा अजितदादा गटाला इशारा

मोदींच्या विचारांसोबत गेल्यानंतर ‘त्यांची’ फाईल कपाटात ठेवली जाईल. पण उद्या ती फाईल कधीही बाहेर काढली जाईल. त्यामुळे आजचे मरण उद्यावर गेलं असं वाटलं तर त्यात काही चुकीचं नाही. ‘त्यांच्या’ डोक्यावर कारवाईची तलवार नेहमी राहील अशी स्पष्ट भूमिका मांडतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजितदादा गटाला इशारा दिला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय तपास यंत्रणा, अजित पवार गट याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. वर्चस्वातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नाही तर एजन्सींकडून (तपास यंत्रणा) चौकशीचे जे उद्योग सुरू होते त्यामुळे अनेक सहकारी अस्वस्थ झाल्याने त्यांनी हे कृत्य केले असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

चौकशीच्या ससेमिऱयामुळे सहकारी अस्वस्थ होते

केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या ससेमिऱयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही सहकारी अस्वस्थ होते. त्यांची खंत ते माझ्यासमोर मांडत होते. हल्ली भाजपला वॉशिंग मशीन म्हटलं जातं. म्हणजे वॉशिंग मशिंगमध्ये टाकलं की स्वच्छ धुवून बाहेर निघू. तशी संधी आपल्याला मिळेल असं काही लोकांच मत होतं असं शरद पवार म्हणाले.

त्यांचे भवितव्य मोदींच्या हातात

पहाटेचा शपथविधीचा अजित पवारांचा निर्णय चुकीचा होता. दुरूस्ती करण्याची संधी द्या असे अजित पवार म्हणाले होते. त्यामुळे त्यांना संधी दिली असे शरद पवार यांनी सांगितले. अजित पवारांना जशी एक संधी दिली तशी संधी इतर नेत्यांनाही देणार का? यावर शरद पवार म्हणाले, मला वाटत नाही ते परत येतील. जोपर्यंत मोदींच्या हातात सत्ता आहे तोपर्यंत ते परत येणार नाहीत. कारण त्यांचे सर्व भवितव्य मोदींच्या हातात आहे.

अमित शहा यांच्या अजित पवारांना सूचना

गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवारांना बारामती मतदारसंघ जिंकून आणण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मला कळली. बारामतीमध्ये अजुन मी प्रचाराला सुरूवात केलेली नाही. फक्त प्रचाराचा नारळ पह्डण्यासाठी गेलो होतो. शेवटच्या टप्प्यात मी प्रचारासाठी जाईन असे शरद पवार यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच… मिलिंद देवरा यांच्या गळ्यात मनसेचं उपरणं; म्हणाले, मी नुकतंच…
दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजित करण्यात आला होता. या...
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी जे पी नड्डा यांना पोलिसांचे समन्स 
‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..
दांदावर दादा नाराज, अजित पवारांसमोर असं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
समाधान पाटील याचा राजकीय खूनच! खेकड्याची चाकरी करणार्‍या पोलिसांच्या भूमिकेवर संशय
ग्रामपंचायतप्रमाणे निवडणूक लढवा ! नीलेश लंके यांचे कार्यकर्त्याना आवाहन
आंबेगाव तालुक्यातील डिंभे कालव्यावरचा पूल कोसळला