‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..

‘क्या कूल हैं हम’ चित्रपटाचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन, रितेश देशमुख याने..

नुकताच एक अत्यंत हैराण करणारी बातमी पुढे येताना दिसत आहे. चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. प्रसिद्ध दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफरचे निधन झाले आहे. आता अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलंय. बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानेही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संगीत सिवन यांचे बुधवारी निधन झाले. आता संगीत सिवन यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे.

रिपोर्टनुसार, खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना संगीत सिवन यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन कसे झाले, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. संगीत सिवन यांच्या निधनानंतर अभिनेता रितेश देशमुख याने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. फक्त रितेश देशमुख हाच नाही तर अनेक कलाकारांनी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

रितेश देशमुखने फोटो शेअर करत लिहिले की, हे जाणून मला धक्का बसला की, संगीत सिवन हे आज आपल्यात नाहीत, खरोखरच मी हैराण झालोय. एक नवीन कलाकार म्हणून, कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवावा आणि तुम्हाला संधी द्यावी एवढीच तुमची इच्छा असते. क्या कूल हैं हम और आपण सपना मनी मनीसाठी त्यांना धन्यवाद बोलू शकलो नसल्याचेही रितेश देशमुख याने म्हटले.

पुढे रितेशने लिहिले की, प्रेमाने बोलणारे आणि नम्र असलेले माणूस, आज माझे हदय तुटले. मी त्यांच्या कुटुबाच्या दुखात सहभागी असल्याचेही रितेशने म्हटले. मी तुम्हाला आणि तुमच्या हास्याला मिस करेल असेही रितेश देशमुख याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. संगीत यांनी पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमधून चित्रपटाचा कोर्स केला.

संगीत सिवन यांनी 61 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. संगीत सिवन हे संतोष सिवन आणि संजीव सिवन यांचे भाऊ होत. संगीत सिवन यांनी अचानक जगाचा निरोप घेतल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. मात्र, अजूनही संगीत सिवन यांच्या निधनाचे नेमके कारण काय हे कळू शकले नाहीये. मात्र, सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;