रत्नागिरी-सिंधुदुर्गात 62.52 टक्के मतदान; विनायक राऊत यांना विजयाचा आत्मविश्वास

रत्नागिरी-सिंधुदुर्गात 62.52 टक्के मतदान; विनायक राऊत यांना विजयाचा आत्मविश्वास

रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदान प्रक्रिया पार पडल्यामुळे गेले दीड महिना तापलेले राजकीय वातावरण शांत झाले आहे. उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंदीस्त झाले असून आता सर्वांना 4 जूनची प्रतिक्षा आहे. 4 जूनला मतमोजणी होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना विजयाचा आत्मविश्वास आहे. ते हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी काल मंगळवार 7 मे रोजी मतदान झाले. दिवसभरात संपूर्ण मतदार संघात 62.52 टक्के मतदान झाले. मतदार संघातील 1942 मतदान केंद्रावर 14 लाख 51 हजार 630 मतदार होते. त्यापैकी 4 लाख 59 हजार 099 पुरुष, 4 लाख 48 हजार 518 महिला आणि तृतीयपंथी एका मतदाराने मतदान केले. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी 50.58 टक्के आहे तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी 49.42 टक्के आहे. चिपळूण विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 69 हजार 791 मतदारांपैकी 1 लाख 55 हजार 057 मतदारांनी मतदान केले. चिपळ्ण विधानसभा मतदार संघात 57.46 टक्के मतदान झाले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 83 हजार 552 मतदारांपैकी 1 लाख 72हजार 139 मतदारांनी मतदान केले. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 60.71 टक्के मतदान झाले. राजापूर विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 33 हजार 721 मतदारांपैकी 1 लाख 41 हजार 033 मतदारांनी मतदान केले. राजापूर विधानसभा मतदार संघात 60.34 टक्के मतदान झाले.

सिंधुदुर्गात मतदानाचा टक्का वाढला
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात सुमारे 60 टक्के मतदान झाले आहे. सिंधुदुर्गात मात्र मतदानाचा टक्का वाढला आहे. कणकवली विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 27 हजार 735 मतदारांपैकी 1 लाख 50 हजार 320 मतदारांनी मतदान केले. कणकवली विधानसभा मतदार संघात 66.01 टक्के मतदान झाले. कुडाळ विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 12 हजार 360 मतदारांपैकी 1 लाख 39 हजार 856 मतदारांनी आपला हक्क बजावला. कुडाळ विधानसभा मतदार संघात 65.86 टक्के मतदान झाले. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान झाले. सावंतवाडी मतदार संघातील 2 लाख 24 हजार 471 मतदारांपैकी 1 लाख 49 हजार 243 मतदारांनी मतदान केले. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात 66.49 टक्के मतदान झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल सांगली मार्केट यार्डात रस्त्यात खड्डे की खड्डय़ात रस्ता? महानगरपालिका-बाजार समितीच्या वादात व्यापारी, शेतकऱयांचे हाल
सांगली मार्केट यार्डातील रस्ता पावसाळ्यापूर्वीच खराब झाला आहे. रस्त्यात खड्डा की खड्डय़ात रस्ता, अशी रस्त्याची दयनीय स्थिती मार्केट यार्ड परिसरात...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया जुलैमध्ये?
पतसंस्थेची फसवणूक; व्यापाऱयाला सक्तमजुरीची शिक्षा, चार लाखांचा दंड
गणेशमूर्ती करणाऱ्या 130 कारखान्यांना नोटिसा, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी नगर महापालिकेची मोहीम
नोकरदारांना दिलेल्या कर्जाचे 28 कोटी थकले, वसुलीसाठी सांगली जिल्हा बँकेची विशेष मोहीम
एमसीए प्रेसिडेंट चषक; माटुंगा जिमखान्याला सी आणि डी डिव्हिजनचे जेतेपद
महाबळेश्वरमध्ये आलेल्या पर्यटकांना असुविधांचा फटका, वेण्णालेक ते महाडनाका दरम्यानच्या फुटपाथची दुरवस्था