पारनेरमध्ये शिवसेनेची शनिवारी बैठक

पारनेरमध्ये शिवसेनेची शनिवारी बैठक

लोकसभा निवडणूकीसंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेची शनिवार 4 मे रोजी सकाळी 11 वाजता पारनेर शहरातील सेनापती बापट स्मारक येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी दिली. पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेना शाखाप्रमुख, युवा सेना शाखा प्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारनेर तालुक्यातून भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांना पाठींबा असल्याचे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, माजी आमदार विजय औटी यांनी 1 मे रोजी जाहिर केले होते. त्यांच्या घोषणेपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी मते जाणून घेतली होती. पक् प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच आपण मदत करणे क्रमप्राप्त असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी दोन दिवसानंतर आपण आपला निर्णय जाहिर करू असे औटी यांनी सांगितले होते.
पदाधिकाऱ्यांच्या भुमिकेस छेद देत दोन दिवसानंतर मात्र विजय औटी यांनी सुजय विखे यांना पाठींबा जाहिर केला. औटी यांची ही भूमिका पदाधिकाऱ्यांना रूचली नाही. जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांनीही पदाधिकाऱ्यांना जाब विचारत नगर येथे तातडीने बैठक बोलविली. या बैठकीत आम्ही महाविकास आघाडीसोबत असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. पत्रकार परीषदेत तशी घोषणाही केली. या पार्श्‍वभुमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी  प्रा. गाडे यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;