सुबोध भावेंच्या शुभेच्छांनी चर्चांना उधाण.. टेलिव्हिजनवर होणार का अनोखा प्रयोग?

सुबोध भावेंच्या शुभेच्छांनी चर्चांना उधाण.. टेलिव्हिजनवर होणार का अनोखा प्रयोग?

सुबोध भावे हे मराठी चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातले एक नामवंत अभिनेते आहेत. मराठीतले सर्वाधिक बायोपिक करण्याचा एक अलिखित विक्रमही त्यांच्या नावावर आहे. पण, चित्रपटसृष्टीत झळकण्यापूर्वी सुबोधला प्रेक्षक त्यांनी गाजवलेल्या मालिकांमुळे जास्त ओळखतात. अशा या सुबोध भावेंची सध्या चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. निमित्त ठरलंय ते त्यांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे

सुबोध भावे आपल्या सोशल मिडियाद्वारे आपल्या चाहत्यांना त्यांच्या आयुष्यतल्या विशेष अनुभवांबद्दल नेहमीच सांगत असतात. त्यांचा चाहतावर्ग यांच्या सोशल मिडियावर नजर ठेवून असतो. सुबोध यांनी आपल्या सोशल मिडियावर एक अनोखा आणि विशेष असा व्हिडिओ शेअर केला. 6 मे 1991 रोजी सुबोध यांनी त्यांची पत्नी मंजिरी हिला प्रपोझ केलं होतं आणि तब्बल 33 वर्षांनी सुबोध यांनी त्या दिवसाला उजाळा देत पत्नी मंजिरीला शुभेच्छा दिल्या.

पण या व्हिडिओची खास गोष्ट ही आहे की या व्हिडिओत सुबोध यांचा चेहरा चक्क तरुणपणातल्या सुबोधसारखा आहे! प्रेक्षक या व्हिडिओमुळे खूश झाले आहेत. त्याशिवाय या व्हिडिओ दरम्यान सुबोध यांना त्यांच्या प्रेमकथेची आठवण झाली कारण आजच्याच दिवशी त्यांचा प्रपोझल दिवस होता. सुबोध यांनी ही खास गोष्ट प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे. पण या निमित्ताने एक वेगळीच चर्चा रंगली आहे. सुबोध आता पुन्हा मालिकांकडे वळणार का, जर तसं असेल तर या मालिकेत नेमकं काय वेगळं असेल? आणि या शुभेच्छांच्या व्हिडीओत त्याच्याविषयी काही खास दडलं आहे का, असा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;