…म्हणून रणवीर सिंगने हटवले लग्नाचे फोटो, वाचा बातमी

…म्हणून रणवीर सिंगने हटवले लग्नाचे फोटो, वाचा बातमी

दीपिका पदुकोण सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे खूपच चर्चेत आहे. दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या कुटुंबात लवकरच एक नवा पाहुणा येणार आहे. त्यामुळे दीपिकाने तिच्या कामातून सध्या ब्रेक घेतला आहे. तसेच दीपिका आणि रणवीर दोघेही बेबीमूनला गेले आहेत. अलीकडेच, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यामध्ये हे जोडपे विमानातून बाहेर पडताना दिसत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून रणबीर आणि दीपिका एकमेकांपासून वेगळे झाल्याच्या चर्चा होत आहेत.

कारण, रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाचे फोटो रणवीर सिंगच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून गायब झाले आहेत. अशा परिस्थितीत या जोडप्यामध्ये दुरावा आलाय की काय? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. मात्र, या बॉलीवूड सुपरस्टार जोडप्याने याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे चाहते आणखी बुचकळ्यात पडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दरम्यान दीपिका आणि रणवीर सिंगच्या बेबी मूनच्या फोटोने चाहत्यांना थोडा दिलासा दिला. चाहत्यांना नाराज पाहून रणवीर सिंगच्या टीमने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात जोडप्यामध्ये सर्व काही ठीक असल्याची माहिती दिली आहे. तसेच रणवीरने 2023 पूर्वीच्या सर्व पोस्ट लपवल्या आहेत. यावेळी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे फोटोही लपवण्यात आले असल्याचे रणवीरच्या टीमने सांगितले आहे.

अखेर दीपिका पादूकोणने पोस्ट शेअर करत दिली गोड बातमी…..

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;