गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तहसिलदारसह नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तहसिलदारसह नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया जिल्ह्यातील महसुल विभागात खळबळजनक घटना घडली आहे. गोरेगावचे तहसीलदार किसन के.भदाणे यांच्यासह नायब तहसिलदार नागपुरे आणि एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले आहे. या तिघांच्या विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या प्रकरणाची कारवाई गोरेगाव तहसिल कार्यालयात करण्यात आली. या नंतर या सर्व आरोपींना पुढील तपास कारवाईसाठी गोंदिया येथील कार्यालयात आणण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या गावातील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार तहसीलदार किसन भदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरे यांच्याद्वारे एक लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार आहे. यात गोरेगावचे तहसीलदार किसन के. भदाणे, नायब तहसिलदार नागपुरे आणि गणवीर नावाच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;