Pune news – स्वारगेट जमीन पाडकाम प्रकरणात उपस्थिती अन् हस्तक्षेप; पोलिसावर निलंबनाची कारवाई

Pune news –  स्वारगेट जमीन पाडकाम प्रकरणात उपस्थिती अन् हस्तक्षेप; पोलिसावर निलंबनाची कारवाई

गुलटेकडीतील टीएमव्ही कॉलनीत 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घराचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून अनावश्यक हस्तक्षेप केल्याप्रकरणी पोलीस शिपायाला थेट सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे संबंधीत कर्मचार्‍याची नियुक्ती मुख्यालयात आहे. मात्र, स्वारगेट येथील पाडकाम प्रकरणात त्याची उपस्थिती अन् हस्तक्षेप आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

समीर जगन्नाथ थोरात (नेमणूक – पोलीस मुख्यालय) असे निलंबीत पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. मुकुंदनगर लगतच्या गुलटेकडी परिसरातील टीएमव्ही कॉलनीत तक्रारदार 80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा दोन मजली बंगला आहे. या जागेबाबत बिल्डर देवेश जैन यांच्याशी व्यवहार झाला होता. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. मात्र, त्यापुर्वीच बिल्डरने जबरदस्तीने घराबाहेरील भिंतीचे पाडकाम केले. याप्रकरणी बिल्डर जैन यांच्यासह चौघांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता याच प्रकरणात मुख्यालयातील पोलीस कर्मचारी समीर थोरात याला निलंबीत करण्यात आले आहे.

घटनेच्या वेळी थोरात घटनास्थळी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. थोरात यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात असतानाही ते स्वारगेट परिसरात सुरू असलेल्या पाडकामावेळी तिथे हजर होते. या प्रकरणात त्यांचा अनावश्यक हस्तक्षेप आढळून आला आहे. याबाबत परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलींद मोहीते यांच्या कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुख्यालयाच्या उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी थोरात यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

…यापुर्वी एका कर्मचार्‍याचे निलंबन

याप्रकरणात यापुर्वी स्वारगेट पोलीस ठाण्यातील एका कर्मचार्‍याला निलंबीत करण्यात आले आहे. विजय नामदेव शिंदे असे निलंबीत कर्मचार्‍़याचे नाव आहे. बंगल्यावरील बेकायदा पाडकामाच्या घटनेत बंदोबस्तासाठी नेमलेले असतानाही शिंदे हे त्याठिकाणी गैरहजर आढळले. त्यांच्या अनुपस्थितीत जेसीबीद्वारे कंपाऊंड व लोखंडी गेट तोडण्यात आले. या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलींद मोहीते यांनी निलंबनाचे आदेश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थानी वंशाच्या तरुणांनी झुकरबर्ग यांचा विक्रम मोडला, अवघ्या 22 व्या वर्षी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश हिंदुस्थानी वंशाच्या तरुणांनी झुकरबर्ग यांचा विक्रम मोडला, अवघ्या 22 व्या वर्षी जगातील सर्वात तरुण अब्जाधीश
जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनण्याचा मान फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना वयाच्या 23 व्या वर्षी मिळाला होता. त्यांचा हा विक्रम...
ठाणे महापालिकेचे 3 हजार 900 कोटी कुठे खर्च झाले? चौकशी करा, मुख्यमंत्र्यांना भाजपचे पत्र
शिंदे गटाची कोंडी करण्याचा भाजपचा डाव, गणेश नाईक ठाण्याचे निवडणूक प्रभारी
थंडीत करुन बघा असे मस्त दाटसर टेस्टी टोमॅटो सूप
मोदींनी आमंत्रण दिलंय; पुढील वर्षी हिंदुस्थानला येण्याचा विचार, डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान, IND-PAK युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार
केसांच्या उत्तम वाढीसाठी घरच्या घरी बनवा हा ज्यूस, केस होतील घनदाट
हिवाळ्यात चहामध्ये आलं का घालायला हवं, जाणून घ्या