खांडगावात नाकाबंदी; मोटारीतून कोटींची रोकड जप्त, महसूल आणि पोलीस पथकाची संयुक्त कारवाई

खांडगावात नाकाबंदी; मोटारीतून कोटींची रोकड जप्त, महसूल आणि पोलीस पथकाची संयुक्त कारवाई

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर खांडगाव येथे नाका बंदीदरम्यान संगमनेर शहर पोलीस आणि महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी एका मोटारीतून दीड ते दोन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

पोलीस पथक आणि महसूल विभागाने खांडगाव येथील नाकाबंदीदरम्यान एमएच 25 एएस 8851 या मोटारीतून ही रोकड जप्त केली आहे. यावेळी पथकाने बाबर रज्जाक काजी, अकबर रहमतुला शेख या दोघांना ताब्यात घेतले. सदर रक्कम ही अजमेरा कन्स्ट्रक्शन कंपनीशी संबंधित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रोकड आणि जप्त केलेली मोटार पोलिसांनी महसूल विभागाच्या ताब्यात दिली असून, रकमेची मोजदाद सुरू होती. त्यामुळे नेमकी किती रुपयांची रोकड होती याबाबत प्रशासनाने मौन बाळगले आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले, ही रोकड कुठून आली? कुठे जात होती? कोणासाठी होती? याची सखोल चौकशी होणार आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच पुढील कारवाई निश्चित केली जाईल. फक्त कॅश सापडल्याने लगेच गुन्हा दाखल होत नाही. महसूल विभाग आणि पोलीस पथकाकडून सुरू असलेल्या नाकाबंदीदरम्यान ही संशयास्पद रक्कम आढळून आली. जिल्हाधिकाऱयांच्या आदेशाने विशेष समिती या प्रकरणाचा तपास करणार आहे. दरम्यान, निवडणुकीचा हंगाम तापलेला असताना ‘कोटय़वधींची कॅश’ पकडली गेल्याची चर्चा वेगाने पसरत आहे.

शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, निरीक्षक समीर बारवकर, महसूलचे अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे तसेच जिल्हाधिकारी समितीचे पथक घटनास्थळी हजर झाले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिवाळ्यात महिनाभर दररोज गाजर आणि बीटचा रस प्यायल्यास शरीराला मिळतील ‘हे’ खास फायदे हिवाळ्यात महिनाभर दररोज गाजर आणि बीटचा रस प्यायल्यास शरीराला मिळतील ‘हे’ खास फायदे
हिवाळा ऋतू सुरू झाल्याने आपल्या प्रत्येकांच्या आहारातील खाण्याच्या सवयी बदलू लागतात. या ऋतूत शरीराला अधिक पोषणाची आवश्यकता असते. कारण या...
असं झालं तर… अर्ध्यावर शिक्षण सुटले तर…
सोनभद्रमधील खाणीत मोठी दुर्घटना; दरड कोसळून एका कामगाराचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली 15 जण अडकल्याची भीती
म्यानमारमध्ये सलग दुसऱ्यांदा भुकंप, पुन्हा धक्के बसण्याची शक्यता
बिहार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; निकालानंतर हकालपट्टी होताच माजी मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी
गोदामे खुली करा, अन्यथा तीव्र आंदोलन; कोळी बांधवांचा केंद्र व राज्य शासनाला इशारा
खुशखबर… हवाई दलात नोकरीची संधी! एकूण 340 जागांसाठी भरती, सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात