पुण्यात गँगवॉरचा पुन्हा भडका! गुंडाच्या भावावर भरदिवसा गोळीबार, कोयत्याने वार

पुण्यात गँगवॉरचा पुन्हा भडका! गुंडाच्या भावावर भरदिवसा गोळीबार, कोयत्याने वार

शहरातील गुन्हेगारी जगतात पुन्हा एकदा गँगवॉरचा भडका उडाला आहे. कोंढव्यातील खडी मशीन चौक परिसरात भरदिवसा दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. खून झालेला तरुण हा वनराज आंदेकर खून प्रकरणात अटक असलेल्या आरोपीचा भाऊ आहे. या घटनेने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कायम आहे.

गणेश काळे (32) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गणेश हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. समीर काळे याने वनराज खून प्रकरणात पिस्तूल पुरविले होते. तेव्हापासून समीर कारागृहात आहे. त्यामुळे या हत्येमागे बदला घेण्याच्या हेतूने केलेले टोळीयुद्ध असण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळे रिक्षाचालक म्हणून काम करतो. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

आरोपीच्या शोधासाठी 10 पथके

भरदुपारी तरुणावर फायरिंग करून आरोपी पसार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू असून, शोधासाठी 10 पथके रवाना करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-5चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली.

भरदुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ-5चे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्यासह पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. काळे याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर पसार होताना हल्लेखोरांची एक दुचाकी तेथेच असून, पोलिसांनी ती जप्त केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी नेपाळमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; चार जखमी
सोमवारी ईशान्य नेपाळमध्ये सोमवारी झालेल्या हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले आहेत. यालुंग री शिखरावर ही...
Andhra Pradesh Accident – हैदराबादला जाणारी बस उलटली, एकाचा मृत्यू; अनेक जखमी
बुधवारपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौर्‍यावर, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधणार; अंबादास दानवे यांची माहिती
हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदेच फायदे, जाणून घ्या मोठी माहिती
लग्नाला नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा
रत्नागिरीकरांना करोडोचा चुना लावणाऱ्या आर्जू टेकसोलची मालमत्ता जप्त होणार, प्रांताधिकाऱ्यांनी केली पाहणी
Pandharpur News – कार्तिकी वारीची सांगता; नगरपरिषदेची विशेष मोहीम, 1600 कर्मचाऱ्यांची शहर स्वच्छतेसाठी नियुक्ती