बिहार निवडणूक प्रक्रियेत गडबड, दोन आठवड्यांत पुरावे देऊ – केसी वेणुगोपाल
बिहार निवडणूक प्रक्रियेत गडबड झाली असून पुढील एक ते दोन आठवड्यांत याचे पुरावे देऊ, असं काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाल आहेत. बिहार निवडणूक निकलांवर आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.
केसी वेणुगोपाल म्हणाले आहेत की, “बिहारमधून आलेला निकाल आपल्या सर्वांसाठी अविश्वसनीय आहे. ९०% स्ट्राइक रेट हा हिंदुस्थानच्या इतिहासात अभूतपूर्व आहे. आम्ही डेटा गोळा करत आहोत आणि त्याचे सखोल विश्लेषण करत आहोत आणि १ ते २ आठवड्यांत आम्ही ठोस पुरावे देऊ. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे संशयास्पद आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे एकतर्फी आहे, पारदर्शकता नाही.”
याच मुद्द्यावर बोलताना काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले की, “सुरुवातीपासूनच निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्यामुळे हे निकाल आश्चर्यकारक आहेत. आमचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी सतत अनियमितता नोंदवत आहेत. सर्व आघाडी पक्ष या निकालाला अनपेक्षित मानतात आणि चौकशीची मागणी करत आहेत.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List