बिहारमध्ये निवनिर्वाचित आमदारांपैकी 90% कोट्यधीश; सर्वाधिक श्रीमंत आमदाराची संपत्ती 170 कोटी
बिहार विधानसभेचे निकाल जाहीर झाले असून आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता नवनिर्वाचित आमदारांच्या संपत्तीबाबत माहिती मिळाली आहे. नवनिर्वाचित आमदरांपैकी 90 टक्के आमदार कोट्यधीश आहे. त्यामुळे बिहारच्या नवनिर्वाचित 18 व्या विधानसभेत पूर्वीपेक्षा जास्त श्रीमंत दिसणार आहेत. पाच वर्षांत कोट्याधीश आमदारांची संख्या वाढलीच तसेच त्यांच्या सरासरी मालमत्तेतही दुपटीने वाढ झाली आहे. २४३ आमदारांपैकी २१८ आमदार कोट्यधीश आहेत. ही संख्या ९० टक्के आहेत. मागील कार्यकाळात कोट्यधीश आमदारांची संख्या १९४ होती, ती आता 218 झाली आहे. म्हणजेच यावेळी कोट्यधीश आमदारांची संख्या 9 टक्क्यांनी वाढली आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि इलेक्शन वॉच यांनी आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचा सविस्तर अभ्यास केल्यानंतर ही माहिती मिळाली आहे. निवडणुकीच्या नामांकनादरम्यान सादर केलेल्या मालमत्तेच्या तपशीलांचे विश्लेषण करताना, दोन्ही संघटनांनी अहवाल दिला की विधानसभेची एकूण घोषित मालमत्ता अंदाजे २,१९३ कोटी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पाच वर्षांपूर्वी आमदारांची सरासरी मालमत्ता ४.३२ कोटी होती, तर यावेळी ती ९.२ कोटी झाली आहे, म्हणजेच त्यांची संपत्ती दुप्पट झाली आहे.
नवीन विधानसभेत संपत्ती आणि गरिबीमधील अंतरही खूप मोठे आहे. सर्वाधिक संपत्ती मुंगेरचे भाजप आमदार कुमार प्रणय यांची आहे, ज्यांची घोषित मालमत्ता १७० कोटींपेक्षा जास्त आहे.तर सर्वात कमी संपत्ती असलेले आमदार म्हणजे पिरपैंती येथील भाजपचे मुरारी पासवान, ज्यांची घोषित मालमत्ता ६ लाखांपेक्षा थोडी जास्त आहे.
दुसऱ्या क्रमांकावर असलेले मोकामा येथील जेडीयूचे अनंत सिंह यांची मालमत्ता १०० कोटींपेक्षा जास्त आहे. दरम्यान, आगियां येथील भाजप आमदार महेश पासवान यांनी अंदाजे ८ लाखांची मालमत्ता जाहीर केली आहे.
नवनिर्वाचित आमदरांपैकी जेडीयूच्या ८५ पैकी ७८ आमदार कोट्यधीश आहेत. भाजपच्या ८९ पैकी ७७ आमदार कोट्यधीश आहेत. आरजेडीच्या २५ पैकी २४ आमदार कोट्यधीश आहेत. एलजेपीच्या (रामविलास) १९ पैकी १६ आमदार कोट्यधीश आहेत. काँग्रेसच्या ६ पैकी ६ कोट्यधीश आहेत. एआयएमआयएमचे सर्व ५ आमदार कोट्यधीश आहेत. एचएएमचे ५ पैकी ४ कोट्यधीश आहेत. राष्ट्रीय लोक मोर्चाच्या ४ पैकी ४ कोट्यधीश आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List