25 नोव्हेंबरपासून विवेकानंद व्याख्यानमाला
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या वतीने 68 व्या विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. ही व्याख्यानमाला 25 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत रात्री 8. 30 वाजता लालबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, गरमखाडा येथे होणार आहे आहे.
पहिले पुष्प 25 नोव्हेंबर रोजी ‘हवामान बदल आणि तरुणाई’ या विषयावर निसर्ग मानसकन्या प्राची शेवगावकर तर 25 नोव्हेंबर रोजी दुसरे पुष्प ह.भ.प. डॉ. हरिदास महाराज पालवे शास्त्री ‘श्री संत ज्ञानेश्वर आणि आधुनिक युग’ या विषयावर गुंफणार आहेत. 27 नोव्हेंबर रोजी तिसरे पुष्प ‘भाषा ः अभिजात आणि बहुजन’ या विषयावर भाषा तज्ञ डॉ. गणेश देवी तर 28 नोव्हेंबर रोजी चौथे पुष्प निवृत्त प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख ‘आभासी जगातील पालकत्व’ या विषयावर गुंफणार आहेत. 29 नोव्हेंबर रोजी पाचवे आणि अंतिम पुष्प ‘एआय ः भीती की संधी’ या विषयावर माहिती-तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ चिन्मय गवाणकर गुंफणार असून या दिवशी ‘विवेकानंद स्मृती’ या जाहिरात अंकाचे प्रकाशन होणार आहे, अशी माहिती व्याख्यानमाला प्रमुख मंगेश सावंत यांनी दिली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List