खुशखबर… हवाई दलात नोकरीची संधी! एकूण 340 जागांसाठी भरती, सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात

खुशखबर… हवाई दलात नोकरीची संधी! एकूण 340 जागांसाठी भरती, सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात

देशसेवा करण्याची आवड असणाऱ्या तरुणांसाठी हिंदुस्थानी हवाई दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्थानी हवाई दलामध्ये एएफसीएटी एन्ट्री आणि एनसीसी स्पेशल एन्ट्री अंतर्गत फ्लाइंग, ग्राउंड डय़ुटी (टेक्निकल), ग्राउंड डय़ुटी (नॉन टेक्निकल) आणि फ्लाइंग ऑफिसरच्या एकूण 340 जागा भरल्या जाणार आहेत. या जागा कमिशंड ऑफिसरच्या आहेत.

या पदासाठी उमेदवार बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेला असावा. उद्या, सोमवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. 31 जानेवारी 2026 मध्ये देशभरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती हवाई दलाची अधिकृत वेबसाईट https://indianairforce.nic.in वर देण्यात आली आहे. एएफसीएटी एन्ट्रीचा फॉर्म भरण्यासाठी 550 अधिक जीएसटी फी भरावी लागेल, तर एनसीसी स्पेशल एन्ट्रीसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा पगार आणि भत्ते असणार आहेत. सविस्तर माहिती जाहिरातीत देण्यात आली आहे. फ्लाइंग ऑफिसरसाठी 56,100 ते 1,77,500 रुपये, अधिक एमएसपी – 15,500 रुपये मिळणार आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

एएफसीएटी एन्ट्री-फ्लाइंगसाठी 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण, भौतिकशास्त्र आणि गणित विषयात 60 टक्के गुण आवश्यक. एएफसीएटी एन्ट्री ग्राउंड डय़ुटी टेक्निकलसाठी भौतिकशास्त्र आणि गणित विषयासोबत 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण, एएफसीएटी एन्ट्री नॉन टेक्निकलसाठी 60 टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60 टक्के बीकॉमसह बीएससी फायनान्समध्ये उत्तीर्ण, एनसीसी स्पेशल एन्ट्री फ्लाइंग पदासाठी एनसीसी एअर विंग सीनिअर डिव्हिजन सी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा

फ्लाइंग – 38 जागा

ग्राउंड डय़ुटी (टेक्निकल) – 188 जागा

ग्राउंड डय़ुटी (नॉन टेक्निकल) – 144

एनसीसी स्पेशल एन्ट्री – 10 टक्के जागा

वयाची अट किती

फ्लाइंगसह एनसीसी स्पेशल एन्ट्री – 20 ते 24 वर्षे

ग्राउंड डय़ुटी (टेक्निकल) आणि  ग्राउंड डय़ुटी (नॉन टेक्निकल) – 20 ते 26 वर्षे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चिंचणीच्या भाजप सरपंचाचा विकास निधीवर डल्ला, 10 सदस्यांची तक्रार चिंचणीच्या भाजप सरपंचाचा विकास निधीवर डल्ला, 10 सदस्यांची तक्रार
डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या भाजप सरपंच मेघा शिंगडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीतील दहा सदस्यांनी विकास निधीच्या गैरवापरासह अनेक गंभीर आरोप करत...
नवी मुंबईत 100 हेक्टरवर उभी राहणार आंतरराष्ट्रीय एज्युसिटी
प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी दरीत कोसळली; 40 जण जखमी
रविवार ठरला अपघात वार! 24 तासात 4 भीषण अपघातांमध्ये 17 जण ठार; 40 हून अधिक जखमी
भाजप, अजित पवार गट कारस्थानी, शिंदे गटाच्या आमदाराची आगपाखड
वसईच्या टोलनाक्यासाठी सरनाईकांनी दिलेल्या पत्राला गडकरींची केराची टोपली
Delhi Blast News : दिल्लीत स्फोटाच्या ठिकाणी आढळले तीन काडतूस, टेरर फंडिंगचाही शोध सुरू