बिहार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; निकालानंतर हकालपट्टी होताच माजी मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी

बिहार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; निकालानंतर हकालपट्टी होताच माजी मंत्र्याची भाजपला सोडचिठ्ठी

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएने पाशवी बहुमत मिळवले. भाजप-जदयू मित्रपक्षांनी 200 हून अधिक जागा मिळवल्या. या निवडणुकीआधी नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटी रुपयांच्या वीज घोटाळ्याचा आरोप झाला होता. भाजपजे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी हा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. आता निकालानंतर त्यांना याची शिक्षा मिळाली असून भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

भाजपने आर. के. सिह यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. याबाबत भाजपने एक पत्र जारी केले असून पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले. या कारवाईनंतर अवघ्या काही तासांमध्ये आर. के. सिंह यांनी भाजप सदस्यत्वाचाही राजीनामा देत पक्षाला रामराम केला. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे.

बिहार विधानसभेचा निकाल लागल्यानंतर भाजपने पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल आर. के. सिंह यांच्यासह तीन बड्या नेत्यांवर कारवाई केली. पक्षाच्या कारवाईनंतर त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. आर. के. सिंह यांनी भगलपूर येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट एनडीए सरकारने अदानी समूहाच्या कंपनीला देण्यात घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

अदानी समूहापेक्षा एनटीपीसी कमी खर्चात हा प्रकल्प राबवू शकली असती असे सिंह यांनी म्हटले होते. अदानी प्रकल्पातून 6 रुपये प्रति युनिट या दराने वीज खरेदी करण्यास नितीश कुमार सरकारने सहमती दर्शवल्यानंतर त्यांनी हा आरोप केला होता. यात त्यांनी 60 हजार कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता.

आर. के. सिंह हे 1975 च्या बिहार केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी याआधी यूपीए सरकारमध्येही गृहसचिव म्हणून काम केले होते. 2013 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी अर्राह लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र 2024 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चिंचणीच्या भाजप सरपंचाचा विकास निधीवर डल्ला, 10 सदस्यांची तक्रार चिंचणीच्या भाजप सरपंचाचा विकास निधीवर डल्ला, 10 सदस्यांची तक्रार
डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या भाजप सरपंच मेघा शिंगडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीतील दहा सदस्यांनी विकास निधीच्या गैरवापरासह अनेक गंभीर आरोप करत...
नवी मुंबईत 100 हेक्टरवर उभी राहणार आंतरराष्ट्रीय एज्युसिटी
प्रवाशांनी खचाखच भरलेली एसटी दरीत कोसळली; 40 जण जखमी
रविवार ठरला अपघात वार! 24 तासात 4 भीषण अपघातांमध्ये 17 जण ठार; 40 हून अधिक जखमी
भाजप, अजित पवार गट कारस्थानी, शिंदे गटाच्या आमदाराची आगपाखड
वसईच्या टोलनाक्यासाठी सरनाईकांनी दिलेल्या पत्राला गडकरींची केराची टोपली
Delhi Blast News : दिल्लीत स्फोटाच्या ठिकाणी आढळले तीन काडतूस, टेरर फंडिंगचाही शोध सुरू