आमचा गरिबांचा पक्ष, गरिबांसाठी आवाज उठवत राहणार; बिहार निवडणुकीनंतर राजदची प्रतिक्रिया
बिहार विधानसभेचे निकाल जाहीर झाले असून आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची चर्चा रंगली आहे. आता निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तेजस्वी यादव यांच्या राजदने प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाची ही प्रतिक्रिया राजदच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. निडणुकीत गडबड असल्याचे आधीपासून दिसत होते. त्यामुळे हे निकाल धक्कादायक असून त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तेजस्वी यादव यांच्या राजदने प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीतील पराभवाचं दुःख नाही आणि विजयाचा अभिमान नाही, तसेच आमचा गरिबांचा पक्ष असून गरिबांसाठी आवाज उठवत राहील, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. सार्वजनिक सेवा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, हा एक अंतहीन प्रवास आहे. त्यात चढ-उतार येणारच. त्यामुळे पराभवाचं दुःख नाही आणि विजयाचा अभिमान नाही. राष्ट्रीय जनता दल हा गरिबांचा पक्ष आहे आणि गरिबांसाठी आवाज उठवत राहील, अशी प्रतिक्रिया राजदने दिली आहे.
जनसेवा एक अनवरत प्रक्रिया है, एक अंतहीन यात्रा है!
इसमें उतार चढ़ाव आना तय है। हार में विषाद नहीं, जीत में अहंकार नहीं!
राष्ट्रीय जनता दल गरीबों की पार्टी है, गरीबों के बीच उनकी आवाज़ बुलंद करते रहेगी!@yadavtejashwi @laluprasadrjd— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) November 15, 2025
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाआघाडीच्या अपयशाबाबत म्हटलं की, मी बिहारच्या कोट्यवधी मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी महागठबंधनवर आपला विश्वास दाखवला. बिहारचा हा निकाल खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. आम्ही एका अशा निवडणुकीत विजय मिळवू शकलो नाही, जी सुरुवातीपासूनच निष्पक्ष नव्हती. ही लढाई संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची आहे. काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी या निकालाची सखोल समीक्षा करेल आणि लोकशाही वाचवण्याचे आपले प्रयत्न अधिक प्रभावी करेल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List