घरबसल्या होणार पोस्टाची कामे; ‘डाक सेवा 2.0’ लॉन्च
डाक विभागाने आपल्या सेवांना अधिक आधुनिक, वेगवान आणि ग्राहकांसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी ‘डाक सेवा 2.0’ हे नवे मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. या अॅपमुळे आता टपालसंबंधित सर्व सेवा नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत. म्हणजेच आता पोस्ट ऑफिसला वारंवार जाण्याची गरज नाही. घरबसल्या मोबाईलच्या सहाय्याने सर्व डाक व्यवहार काही क्षणांत पूर्ण करता येतील.
अँड्रॉइड वापरकर्ते हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून आणि आयफोन वापरकर्ते अॅपल अॅप स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करू शकतात. अॅपच्या मदतीने ग्राहकांना पार्सल आणि मनीऑर्डर ट्रक करता येणार आहेत. त्याचबरोबर टपालांची गणना, मेल बुकिंग, ई-रसीद तयार करणे, तक्रारी नोंदवणे अशा अनेक सुविधा या अॅपमधून उपलब्ध आहेत.
23 भाषांमध्ये कार्यरत
‘डाक सेवा 2.0’ अॅप एकूण 23 भाषांमध्ये कार्यरत आहे, ज्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, पंजाबी, कोंकणी, मैथिली, बंगाली, डोगरी आणि उर्दू अशा भाषांचा समावेश आहे. अॅपच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात भाषेचा पर्याय दिसतो, त्यावर क्लिक करून वापरकर्ते आपल्या सोयीची भाषा निवडून ती डिफॉल्ट म्हणून सेट करू शकतात.
‘डाक सेवा 2.0’ अॅपचे काही प्रमुख फायदे म्हणजे पार्सल, स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पत्रांचे ट्रॅकिंग, पार्सलची माहिती भरून शुल्काची गणना, जवळचे पोस्ट ऑफिस शोधणे, घरबसल्या ई-रिसीट मिळवणे आणि ऑनलाइन तक्रार नोंदवणे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर एक लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले.
जर एखाद्या सेवेबाबत युजरला अडचण किंवा तक्रार असेल, तर तो अॅपच्या माध्यमातून ती नोंदवू शकतो. पोस्ट ऑफिस, पार्सल किंवा व्यवहारांशी संबंधित तक्रारीसाठी युजर्स थेट ऑनलाइन अर्ज करू शकतात तसेच तक्रारीची स्थिती ट्रकही करू शकतात. याशिवाय 18002666868 या टोल-फ्री क्रमांकावर कॉल करून मदत मिळवता येते किंवा अॅपमधील ऑनलाइन असिस्टंटसोबत थेट चॅट करता येते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List