कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने होतात चमत्कारिक फायदे, वाचा…
बॅक्टेरिया नष्ट होतो - प्राचीन काळात लोक कडुलिंबाच्या काडीने दात घासायचे. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते.
हिरड्यांसाठी फायदेशीर - कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने हिरड्यांमध्ये असलेली सूजदेखील कमी होते. तसेच हिरड्या मजबूत होतात आणि हिरड्यांचे आरोग्यदेखील सुधारते. तसेच हिरड्यांमध्ये होणारा संसर्ग टळला जातो.
तोंडाची दुर्गंधी दूर होते - कडुलिंबाच्या नैसर्गिक कडू रसाने तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि तोंड ताजेतवाने राहते. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक लोक दररोज लिंबाच्या काडीने दात घासतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List