माता न तूं वैरिणी! समलैंगीक मैत्रीणीसोबत मिळून पाच महिन्याच्या बाळाची केली हत्या
तामिळनाडूमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका मातेने आपल्या समलैंगीक मैत्रीणीसोबत मिळून आपल्या पाच महिन्याच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 5 नोव्हेबर रोजी घडली असून त्यावेळी बाळ दूध पिताना बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मातेसह तिच्या मैत्रीणीला अटक केली आहे.
महिलेचा पतीचे नाव सुरेश (38) असून त्याने पत्नीने हत्या केल्याचा आरोप केला आहे की, त्याची पत्नी भारती आणि तिची मैत्रीण सुमित्राने त्याच्या मुलाची हत्या केली. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सुरेश मजूरीचे काम करतो तर 26 वर्षीय पत्नी भारती यांना चार आणि पाच वर्षांच्या दोन मुली आहेत. तर सर्वात लहान मुलगा असून तो पाच महिन्याचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेबर रोजी बाळ दूध पिताना ते अचानक बेशुद्ध झाले. त्यानंतर मुलाला केलमंगलम सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे पोहोचल्यानंतर मुलाला मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह दफन करण्यात आला. या प्रकरणाला तेव्हा वेगळे वळण आले जेव्हा सुरेशने मुलाची हत्या केल्याचा आरोप पत्नीवर लावला. त्याला संशयास्पद वाटल्याने त्याने पत्नीचा फोन तपासला. त्यात त्याला तिची आणि तिच्या मैत्रीणीचे एकत्र असे फोटो आणि व्हॉईस मेसेज मिळाले. सुरेशने तत्काळ पोलिसांना कळवले.
पोलिसांनी सांगितले की, भारती आणि सुमित्रा मागच्या तीन वर्षांपासून नात्यात होत्या. भारतीला मुलगा झाल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. दोघंही एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हते. ज्यामुळे हत्येचा कट रचण्यात आला. शिवाय सुरेशने पोलिसांना रेकॉर्डेड फोन कॉलही पाठवले आहे. ज्यामध्ये भारतीने मुलाची हत्या केल्याची कबुल केले होते. त्यानंतर केलमंगलम पोलिसांनी भारती आणि सुमित्रा दोघींना अटक केले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List