रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा – जलज सक्सेनाची ‘सक्सेस’ गोलंदाजी; कर्नाटकच्या पहिल्या दिवशी ५ बाद २५७ धावा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा – जलज सक्सेनाची ‘सक्सेस’ गोलंदाजी; कर्नाटकच्या पहिल्या दिवशी ५ बाद २५७ धावा

कर्नाटक संघाने पहिल्या दिवशी ८९ षटकांत ५ बाद २५७ धावसंख्येपर्यंत मजल मारली. कर्णधार मयंक अग्रवाल (८०) आणि रविचंद्रन स्मरण (५४) यांनी झुंजार अर्धशतके झळकाविली. मात्र, अनुभवी ऑफ-स्पिनर जलज सक्सेनाने आपल्या फिरकी कौशल्याने कर्नाटकला धक्के देत महाराष्ट्रालाही या लढतीत पुनरागमन करून दिले. त्यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रणजी चषक क्रिकेट स्पर्धेतील ‘ब’ गटातील या सामन्यात पहिल्या दिवशी रोमांचक द्वंद्व रंगविले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अभिनव मनोहर ३१, तर श्रेयस गोपाल ३२ धावांवर खेळत होते.

पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर शनिवारपासून हा सामना सुरू झाला. मयंक अग्रवालने १८१ चेंडूंवर सात चौकार आणि दोन षटकारांसह ८० धावांची खेळी केली. मात्र, अखेरच्या सत्रात तो सक्सेनाच्या (३/८०) फिरकीला बळी पडला. सकाळी नाणेफेक जिंकून कर्नाटकने फलंदाजी स्वीकारली. मुकेश चौधरीला लय सापडत नसल्याने महाराष्ट्राने लवकरच फिरकीचा वापर केला.

जलज सक्सेनाने पहिल्याच चेंडूवर अनिशला पायचीत केले आणि ६६ धावांची भागीदारी मोडली. श्रीजीतचा (१०) त्रिफळा उडविला. तिसऱ्या षटकात सक्सेनाने के. एल. मग वेगवान गोलंदाज रामकृष्ण घोषने करुण नायरच्या (४) यष्ट्या वाकवल्या. ८९ धावांवर तीन गडी बाद झाल्यावर कर्नाटकचा डाव संकटात सापडला. तेव्हा अग्रवालला आर. स्मरणची साथ मिळाली. चहापानापूर्वी स्मरणने विकी ओस्तवालच्या चेंडूवर अंकित बावणेकडे झेल दिला. चहापानानंतर सक्सेनाने अग्रवालला सौरभ नवाळेकरवी यष्टीचित केले. महाराष्ट्राकडून जलस सक्सेनाने ३, तर विकी ओस्तवाल व रामकृष्ण घोष यांनी १-१ बळी टिपला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रत्नागिरीत भगवं वादळ; सामाजिक कार्यकर्ते अक्षय कांबळेसह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत रत्नागिरीत भगवं वादळ; सामाजिक कार्यकर्ते अक्षय कांबळेसह असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत
रत्नागिरी शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराला वेग आलेला असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जोरदार पक्षप्रवेश सुरू झाले...
‘मातोश्री’जवळ उडणाऱ्या ड्रोनचं रहस्य आलं समोर; मुंबई पोलिसांनी केला खुलासा, जाणून घ्या…
मृतदेहामध्ये रक्ताभिसरण सुरू करण्यात डॉक्टरांना यश, अवयवदानासाठी मोठे संशोधन
प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट
DSP Richa Ghosh – टीम इंडियाची फिनिशर दिसणार पोलिसांच्या वर्दीत, ममता सरकारनं डीएसपी पदावर नियुक्ती केली
माझ्या जीवाला धोका, लोकं मला मारून टाकतील; तेज प्रताप यादव यांचा दावा
SIR मतचोरी लपवण्याची संस्थात्मक व्यवस्था, माझ्याकडे पुरावे आहेत! – राहुल गांधी